आधी पतीसोबत शॉपिंग, नंतर मेव्हण्याला घेऊन मॉलमधूनच पळाली पत्नी..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Karva Chauth purchased by husband and the wife ran away with her brother-in-law gold and money
Karva Chauth purchased by husband and the wife ran away with her brother-in-law gold and money
social share
google news

love affair : देशभरातील अनेक विवाहित स्त्रिया (Married Womens) आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी करवा चौथचे (Karwa Chauth) व्रत करतात. आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं, नवऱ्याचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्या प्रार्थना करतात. मात्र उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये (Meerut) एक वेगळीच घटना घडली आहे. मेरठमध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्यासोबत  करवा चौथसाठी लागणारी सगळी खरेदी केली. नंतर जे तिने केले ते मात्र अनेकांना धक्का बसला तर पोलिसही हादरुन गेले. कारण करवा चौथची खरेदी करुन ती मेहुण्याबरोबरच पळून गेली आहे.

ADVERTISEMENT

…आता तिच्या मृत्यूसाठी व्रत

त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिचा शोध घेण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे पळून गेलेल्या पत्नीसाठी आता पोलीस स्थानकाचे ते उंबरे झिजवत आहे. मात्र आता तिच्या नवऱ्याचे म्हणणे आहे की, आता माझी बायको मला सापडली नाही तरी चालेल. मात्र आता तिच्या आयुष्यासाठी नाही तर तिच्या मरणासाठी मी व्रत करणार असं त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

हे ही वाचा >> ‘भर चौकात गोळ्या घालेन’, हॉट अभिनेत्री उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

पत्नी मेहुण्याबरोबर पळाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठमधील जानी भागात राहणाऱ्या अशोकच 2019 मध्ये गंगानगरमधील अमहेडा येथील प्रियाबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर दोघंही त्यांच्या संसारात आनंदी होते. त्या दोघांन 18 महिन्याचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशोक यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत एक इच्छा व्यक्त केली. मात्र त्याची इच्छा ऐकून अनेक पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. अशोकच्या आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे पोलिसही विचार करू लागले. कारण अशोक यांनी पोलिसांना सांगितले की, माझी पत्नी मेहुण्याबरोबर पळून गेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.

हे वाचलं का?

सोन्यासह पैसाही गेला

अशोक ज्यावेळी कामावरून घरी परतला होता. त्यावेळी त्याला त्याची पत्नी पळून गेल्याचे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. अशोक एका ठिकाणी नोकरी करुन आपलं घर चालवतो. एक दिवस अशोकचा मेहुणा त्यांच्या घरी आला होता. त्यानंतर ती दोघं घरातून पळून गेली. ती पळून जाताना रिकाम्या हाती गेली नाही. तर अशोक यांच्या घरातील 15 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन ती पळून गेली आहे.

हे ही वाचा >> Maratha Reservation : “आपापली व्होटबँक…”, संभाजीराजेंनी सर्वच नेत्यांवर ओढले ताशेरे

अपहरण केल्याची शक्यता

या सर्व प्रकरणातून मला आणि माझ्या मुलाला पोलिसांनी बाहेर काढावे. तर ज्याच्याबरोबर माझी पत्नी पळून गेली आहे. त्या राहुलविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी अशोकने केली आहे. तर मेरठचे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, अशोक यांच्या पत्नीचे अपहरण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याविरोधात आता पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT