पहिले दिलेली सुपारी, नंतर स्वतःच केलं हत्येचं प्लॅनिंग.. केतन अग्रवाल प्रकरणाला भलतंच वळण

मुंबई तक

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे याला तिसरा आरोपी म्हणून अटक झाली आहे. सुरुवातीला सुपारी देण्याची चर्चा आणि नंतर स्वतः हत्या करण्याच्या कथित कटाचा पोलिस तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

ketan agrawal murder case siya goyal chetan chaudhary ritesh hange arrest pune lonavala lohagad
केतन अग्रवाल हत्या
Google CTA

पुणेः पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा दुवा समोर आला आहे. सुरुवातीला हत्येसाठी बाहेरील व्यक्तीला सुपारी देण्याची चर्चा झाली होती. मात्र, नंतर मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी कथितरित्या स्वतःच हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात चेतनचा जवळचा मित्र रितेश हांगे याला तिसरा आरोपी म्हणून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बीडचा रहिवासी रितेश हांगे नेमका कोण?

रितेश हांगे हा मूळचा बीडचा रहिवासी असून, तो चेतन चौधरीचा जवळचा मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चेतनने सुरुवातीपासूनच हत्येच्या योजनेची माहिती रितेशला दिली होती, असा पोलिसांचा दावा आहे. सिया गोयललाही रितेश ओळखत होता. तपासादरम्यान रितेशविरोधात काही जबाब आणि तांत्रिक पुरावे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

आधी सुपारीची चर्चा, नंतर स्वतः हत्या करण्याचा निर्णय