Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट कुणी रचला? लॉरेन बिश्नोईने 9 दिवसांचा उपवास केला अन्..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lawrence Bishnoi Criminal History
, Lawrence Bishnoi Navratri Fast
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्धीकींच्या हत्येच्या घटनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

लॉरेन बिश्नोईने नवरात्रीत उपवास केला, त्यानंतर काय घडलं?

point

लॉरेन बिश्नोई बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मुख्य सूत्रधार?

Baba Siddique Murder Case latest Update, Lawrence Bishnoi :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी 12 ऑक्टोबरला गोळया झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकींच्या कार्यालयासमोर हल्लेखोरांनी तीन राउंड फायर केले होते. या गोळीबारात सिद्दीकींचा मृत्यू झाला. या हत्येच्या घटनेमुळं राज्यात एकच खबळव उडाली असून गँगस्टर लॉरेन बिश्नोई या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचं सूत्रांकडून समजते. सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी ते बिश्नोई गँगचे शूटर्स असल्याचा दावा केला आहे. अशातच लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. (NCP leader and former minister Baba Siddiqui was shot dead on Saturday 12 October. The assailants fired three rounds in front of Siddiqui's office)

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साबरमती जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईने नवरात्रीत नऊ दिवसांचा उपवास केला होता. यावेळी बिष्नोई कुणाशीही चर्चा करत  नव्हता. तस त्याने अन्न पाण्याचा त्यागही केला होता. बिश्नोई जेव्हा जेव्हा उपवास करतो, त्याची गँग थरारक कारनामा करते, असं बोललं जातं. लॉरेन बिश्नोईचा एक व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये बिश्नोई पाकिस्तानच्या गँगस्टरशी चर्चा करत होता आणि ईदच्या शुभेच्या देत असल्याचं समोर आलं होतं. बिश्नोईने हा कॉल साबरमती जेलमधून केला होता, असा दावा केला जात आहे. परंतु, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साबरमती तुरुंग प्रशासनाने जुना व्हिडीओ असल्याचं सांगत यावर पडदा टाकला होता.

हे ही वाचा >>ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार बोनस; थेट खात्यात जमा होतील 5500, फक्त...

सूत्रांच्या माहितीनुसार, लॉरेन बिश्नोईला साबरमती जेलमध्ये एका वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तो जेलमधून मोबाईल फोनचा वापर करतो. या गोष्टी एजन्सीचे लोकही सांगतात. बिश्नोई अन्न कमी खातो. दूध, दही आणि फळांचं सेवन जास्त करतो. याशिवात तो जेलमध्ये बॅडमिंटन खेळतो आणि व्यायामही करतो. तिहार जेलमध्येही बिश्नोई फोनवरून बोलतो. याचा खुलासा आजतक/इंडिया टुडेनं बिश्नोईच्या इंटरस्टेड कॉलच्या माध्यमातून केला होता. सिद्धू मुसावालाच्या हत्येनंतर बिश्नोईच्या जवळच्या व्यक्तीने जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला कॉल केला होता आणि सिद्धू मुसावाला हत्याकांडची माहिती दिली होती.

हे वाचलं का?

बिश्नोई पंजाब आणि राजस्थानच्या जेलमध्ये होता, त्यावेळीही फोनचा वापर करायचा. गुजरातच्या साबरमती जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईला खास बॅरेकमध्ये ठेवण्यात आला होता. या बॅरेकच्या अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. त्याच्यासोबत अनेक कैदी होते. गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या कैद्यांनाच असा सेलमध्ये ठेवलं जातं. 2008 मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील अतिरेक्यांनाही अशाप्रकारे अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. हा जेलचा सर्वात सुरक्षीत भाग असतो. जिथे बॅरेक आणि सेलच्याबाहेरही सुरक्षा रक्षक असतात.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : दिवाळीआधीच 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार! उद्योगधंद्यातून मिळेल बक्कळ पैसा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT