गुप्तांगात टाकलं लायटर, तरुणाची आतडीच फाटली; नशामुक्ती केंद्रात घडलं भलतंच!
तरुणाची व्यसनापासून मुक्ती व्हावी, तो चांगला माणूस बनवा यासाठी कुटुंबीयांनी व्यसनमुक्ती केंद्रात आणून ठेवले. त्यासाठी पैसाही खर्च करण्यात आला. मात्र त्याच तरुणावर अत्याचार करत त्याच्या गुप्तांगामध्ये लायटर घालून चटणी टाकण्यात आली. त्यामुळे तो आता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Addiction Center Crime: रेवामधील एका व्यसनमुक्ती केंद्रात एका तरुणाबरोबर क्रूरतेची सगळी हद्द ओलांडण्यात आली आहे. कारण तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लायटर (Lighter) टाकून पेटवल्याने आतड्याला गंभीर जखम झाली आहे. तर त्यानंतर अमानुषपणे मारहाण करुन त्याच्या पायावर ॲसिडही (Acid) टाकण्यात आले आहे. त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्यही (Unnatural act) करुन त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part) मिरचीही टाकण्यात आली. त्यानंतर त्याची अवस्था गंभीर झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी 5 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
माणुसकीला काळीमा
या प्रकरणी रेवा येथील विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल झाली असून हे प्रकरण संकल्प व्यसनमुक्ती केंद्राशी संबंधित आहे. हे प्रकरण व्यसनमुक्ती केंद्रात घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ज्या तरुणावर अन्याय करण्यात आला आहे, त्याची व्यसनापासून मुक्ती मिळावी यासाठी त्याला त्या केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्याबाबतीतच माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
व्यसनमुक्ती केंद्र की छळकेंद्र
केंद्राचे संचालक व कर्मचाऱ्यांकडून त्या तरुणाचा प्रचंड वाईट पद्धतीने छळ करण्यात आला आहे. गॅस स्टोव्हचे लायटर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घालण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या आतड्यालाही गंभीर इजा झाली आहे. ही घटना घडल्यानंतर त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. ही घटना घडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करुन त्याच्या आतड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
क्रुरतेने गाठला कळस
ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पीडित तरुणाने आज तकशी बोलताना सांगितले की, पीडितग्रस्त तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकला होता. त्यामुळे त्याची व्यसनापासन मुक्ती व्हावी यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला 25 जुलै 2021 रोजी संकल्प-व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडून महिना 15 ते 18 हजार रुपयेही देण्यात येत होते. याकाळात त्याला त्याच्या कुटुंबायांना मात्र भेटू दिले जात नव्हते. कुटुंबीयही येत नसल्यामुळेच त्याच्यावर अमानुषपणे त्याच्यावर अत्याचार करण्यात येत होते. त्याच्या पायावर अॅसिड ओतून पायाला सुयाही टोचण्यात आल्या होत्या.
कर्मचारीच करायचे घृणास्पद कृत्य
व्यसनमुक्ती केंद्रात त्या तरुणाबरोबर एवढेच केले जात नव्हते तर त्याच्याबरोबर कर्मचारीही अनैसर्गिक कृत्ये केली जात होती. तर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरचीच पूड टाकून भयानक प्रकारे त्याला त्रास देण्यात येत होता. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लायटर घातल्याने त्याचे आतडेही फुटले आहे. या घटनेनंतर केंद्रातील ऑपरेटरने त्याला रुग्णालयात दाखल करुन तो फरार झाला आहे. या प्रकरणी आता पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी कारवाई करत केंद्रातील 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT