28 वर्षीय तरुणी, 55 वर्षांचा लिव्ह-इन पार्टनर..., मृतदेह कालव्यात फेकायला गेला अन् अडकला
lucknow Crime News : लखनौमध्ये 50 हजार रूपयांवरून झालेल्या वादानंतर 55 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याचा आरोप आहे. मृतदेह नहरात फेकण्यासाठी जात असताना पादचारी दिसल्याने आरोपीने मृतदेह फुटपाथवर सोडला, मात्र पोलिसांनी काही तासांत त्याला अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
28 वर्षीय तरुणी, 55 वर्षांचा लिव्ह-इन पार्टनर...,
मृतदेह कालव्यात फेकायला गेला अन् अडकला
lucknow Crime News : लखनौच्या मानकनगर परिसरातून धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. 55 वर्षीय धीरज कुमार सोनकर याने 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर पूजा उर्फ परवीन हिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हत्येनंतर मृतदेह ई-रिक्षामध्ये ठेवून तो फेकण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र, काही पादचारी दिसताच आरोपी घाबरला आणि मृतदेह फुटपाथवरच सोडून ई-रिक्षातून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपीला अटक केली.
हेही वाचा : मुंबई : सर्वांना सोडलं, शेवटी स्कूल बसमध्ये चिमुरडी एकटी राहिली, ड्रायव्हरने केला अत्याचार
दोघांमध्ये दीर्घकाळापासून संबंध, पण त्या मुद्द्यावरुन वाद पेटला अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, धीरज आणि पूजा गेल्या चार-पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि दोघांमध्ये दीर्घकाळापासून संबंध होते. पूजा अनेकदा स्लीपर ग्राउंड परिसरातील धीरजच्या ठिकाणी येऊन त्याच्यासोबत राहत होती. 30 ऑगस्टच्या रात्रीही दोघे एकत्र होते. याचदरम्यान पूजाने धीरजकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे धीरजने सांगितले. नुकतेच कर्ज घेऊन ई-रिक्षा खरेदी केल्याने आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचे त्याने सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद रात्रीपासून सकाळपर्यंत सुरू राहिला. पहाटे सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास पूजा घरी जाण्याचा हट्ट करू लागली. यावेळी तिने धीरजला वाईट परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
