मुंबई : सर्वांना सोडलं, शेवटी स्कूल बसमध्ये चिमुरडी एकटी राहिली, ड्रायव्हरने केला अत्याचार
Mumbai School Bus sexually assault Case : मुंबईत स्कूल बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 30 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली आहे. चिमुरडीने घरी आल्यानंतर आजीला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : बसमधील सर्व मुलांना घरी सोडलं
शेवटी स्कूल बसमध्ये चिमुरडी एकटी राहिली, ड्रायव्हरने केला अत्याचार
Mumbai School Bus sexually assault Case : मुंबईत स्कूल बसमधून घरी जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी 30 वर्षीय चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एका खासगी बसवर चालक म्हणून काम करत होता. ही बस शाळेने विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी भाड्याने घेतली होती. बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडत असताना हा प्रकार घडला. घटनेच्या वेळी चिमुरडी बसमधील शेवटची विद्यार्थीनी होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कारवाई केली आहे.
हेही वाचा : रत्नागिरीहून आलेल्या बापटांनी पुणेकरांना शिकवू नये, ठोंबरेंची पोस्ट, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
बसमध्ये चालकासोबत एकटी राहिली, नराधमाने साधला डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून घेऊन त्यांच्या घरी सोडण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ठिकाणी सोडल्यानंतर तीन वर्षांची चिमुरडी बसमध्ये चालकासोबत एकटी राहिली. याच परिस्थितीचा आरोपीने गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. त्याने बसमध्येच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : भल्या मोठ्या कोयत्याने थेट माजी नगरसेवकावर सपासप वार अन् आरोपी सगळ्यांसमोरून निवांत गेला निघून!
