रत्नागिरीहून आलेल्या बापटांनी पुणेकरांना शिकवू नये, ठोंबरेंची पोस्ट, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

मुंबई तक

Rupali Thombre Patil on Vidyanand Bapat : पुण्यातील गणेशोत्सव डीजेमुक्त आणि ध्वनीप्रदूषण न करता साजरा करण्याची भूमिका विद्यानंद बापट यांनी मांडली. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बापटांवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

Rupali Thombre Patil on Vidyanand Bapat
Rupali Thombre Patil on Vidyanand Bapat
Google CTA

बातम्या हायलाइट

point

"रत्नागिरीहून आलेल्या बापटांनी पुणेकरांना शिकवू नये"

point

ठोंबरेंची पोस्ट, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Rupali Thombre Patil on Vidyanand Bapat : पुण्यातील गणेशोत्सव डीजेमुक्त आणि ध्वनीप्रदूषण न करता साजरा करावा, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी भूमिका जागरूक नागरिक विद्यानंद बापट यांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवरून आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बापट यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये बापट यांच्या पुणेकर असण्यावरच प्रश्न उपस्थित करत, पुण्यातील गणेशोत्सवाबाबत पुणेकरांना शिकवू नये, अशी भूमिका मांडली आहे.

हेही वाचा : भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला थेट दिली सत्ता सोडण्याची धमकी.. 'ते' नेमकं प्रकरण काय?

"पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये"

रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “अरे देवा बापट नावाने पुणेकर म्हणून गंडावले की. सध्या गाजत असलेले विद्यानंद बापट हे पुणेकर नाहीत म्हणून गणपती बाप्पा उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली. पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं!” तसेच रत्नागिरीहून सात वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीसाठी आलेल्या व्यक्तीने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. “आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान - पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार,” अशी भूमिका त्यांनी पोस्टमधून मांडली.

हेही वाचा : Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?