पती-पत्नीने बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना कसा लावला? आतापर्यंत किती माया जमवली?

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या जोडप्याला भोपाळमध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये अजून कोणा-कोणाचा समावेश आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बँकांना कोट्यवधींचा चुना

point

पती-पत्नीला अटक

Crime News : भोपाळमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली फरार असलेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप ममतानी आणि त्याची पत्नी संगीता ममतानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अयोध्या नगर पोलिसांनी 21 नोव्हेंबर रोजी ही कारवाई केली. आरोपी बनावट मालमत्तेची कागदपत्रे तयार करून बँकांकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेत होते. त्यानंतर या पैशांचा वापर आलिशान जीवनशैली जगण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षभरापासून हे दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देत होते.

बँकांना फसवून कर्ज

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी पती-पत्नी घर आणि इतर मालमत्तांची बनावट कागदपत्रे तयार करत असल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांच्या आधारे ते बँकांकडून कर्ज मिळवत होते. त्यानंतर कर्जाची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली जात होती. पोलीस आयुक्त संजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांधकाम व्यावसायिकांसोबत जॉइंट व्हेंचरमध्येही काम करत होते. या संपूर्ण फसवणुकीत किती कोटी रुपयांचे व्यवहार झाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : पैसा- पाणी : इन्फोसिसने 11 वर्षांपूर्वीची 'ती' संधी का गमावली? आज AI क्षेत्रात भारत कुठे असता?

अर्धा डझनपेक्षाही अधिक गुन्हे

या प्रकरणाचा खुलासा सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रॉपर्टी डीलर योगेश सूद यांनी दिलेल्या तक्रारीनंतर झाला होता. त्यांनी अयोध्या नगर पोलीस ठाण्यात संदीप आणि संगीता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपींविरोधात भोपाळमधील विविध पोलीस ठाण्यांसह क्राइम ब्रँच आणि आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) मिळून अर्धा डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच पंजाबमध्येही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही सतत राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना त्यांना पकडण्यात अडचणी येत होत्या. त्यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाने सुमारे 15 अस्थायी वॉरंट जारी केले होते.

हे ही वाचा : Govt Jobs : महिन्याला 1 लाख रुपयांहून अधिक पगार हवाय? 'या' बँकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज

फसवणुकीचे रॅकेट

अखेर प्रॉपर्टी डीलरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली. आता आरोपींची बँक खाती, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे किती मालमत्तांवर कर्ज घेण्यात आले आणि फसवणुकीची रक्कम कुठे खर्च झाली, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. आरोपींच्या चौकशीतून या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या रॅकेटमधील आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.