विवाहितेचा जंगलात सापडला मृतदेह! रक्तरंजित लव्हस्टोरी मोबाईलने…

मुंबई तक

ADVERTISEMENT

women murder : Aarti was constan74ly pressurizing Ashok for marriage, due to which the accused made a plan of murder.
women murder : Aarti was constan74ly pressurizing Ashok for marriage, due to which the accused made a plan of murder.
social share
google news

जंगला विवाहित महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचं काम केलं. ओळख पटल्यावर पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं, विवाहित महिलेची हत्या कुणी आणि का केली असेल? पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीपर्यंत पोहोचवणारा एक दुवा सापडला. पोलिसांच्या हाती मोबाईल हिस्ट्री लागली आणि रक्तरंजित लव्हस्टोरीचा पर्दाफाश झाला.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर सगळेच हादरले आहेत. दोन दिवसांपूर्वी येथील जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्या निनावी मृतदेहासंदर्भात पोलिसांनी 48 तासांत ही घटना उघडकीस आणली. पिपळखुंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोवाई पाडा जंगलात 2 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडल्याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा प्रियकर अशोक निनामा याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

जंगलात आढळला महिलेचा मृतदेह

प्रतापगडचे पोलिस अधिकारी अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून रोजी पिपळखुंट पोलीस स्टेशनला मोवाई पाड्याच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेह रुग्णालयात नेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यावेळी पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार करून संपूर्ण परिसरात महिला बेपत्ता झाल्याची कोणतीही माहिती नजीकच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवून शोध घेण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?

मोबाईल समोर आला अन्…

पाठपुरावा केल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतर महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मृत महिला लिंबोडा पोलीस ठाणे घंटाळी परिसरातील रहिवासी होती. तिचे नाव आरती असल्याचे सांगण्यात आले, जी राहुल हरमोरेची पत्नी होती. पण गावातील लोकांकडून पोलिसांना समजले की, आरतीचे गावातीलच अशोक नावाच्या मुलाशी ती फार काळ असायची. अशोकही अनेकदा त्या महिलेच्या घरी जात असे. पोलिसांनीही मोबाईलद्वारे या माहितीची पडताळणी करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी अशोकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

प्रियकराची कबुली, नेमकं काय घडलं?

चौकशीत अशोक आणि आरती तीन वर्षांपासून संपर्कात असल्याचे समोर आले. आरती अशोकवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती, त्यामुळे आरोपीने खुनाचा कट रचला. आधी तिला आश्वासन दिले, नंतर 31 मे रोजी ठरवलेल्या कटानुसार आरतीला घंटाळीला बोलावून घेतले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Sakshi Murder Case : “डोक्याचे झाले होते चार तुकडे, पोटातील आतडेही…”

दोघेही बसमध्ये बसले आणि मोवाईपाड्याजवळच्या जंगलात गेले. पैशाच्या हव्यासापोटी आणि सुटकेसाठी आरोपीने तिचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. ती बेशुद्ध पडल्यावर दगडाने तिचे डोके ठेचून आरोपीने विवाहितेने अंगावर घातलेले दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT