मुलाला दारूचं व्यसन, बापानेच डोक्यात दगड घातला, मृतदेह लपवण्यासाठी दुसऱ्या मुलाची...घटना काय?
शुभम याचं लग्न झालं होतं, मात्र तो दारूच्या आहारी गेला होता. शुभमच्या दारूच्या व्यसनामुळे आणि त्याच्या मारहाणीला कंटाळून चारच दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुलगा दारू प्यायचा आणि घरी-दारी भांडण करायचा

दारूच्या व्यसनाला कंटाळून बायकोही माहेरी गेली

अखेर बापानं रागाच्या भरात डोक्यात दगड घातला

गुन्हा लपवण्यासाठी दुसऱ्या मुलाच्या मदतीनं काय केलं?
जळगाव : जामनेरमधील कसबा पिंपरी परिसरात एका खळबळजनक घटनेनं एकच खळबळ उडाली. मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या वडिलांनी आपल्या 25 वर्षीय मुलाची डोक्यात दगड घालून हत्या केली. ही घटना अपघात किंवा अज्ञात व्यक्तीनं केलेली हत्या असल्याचा बनावही यानंतर वडिलांनी रचला. मात्र, नंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
हे ही वाचा >> कमी मार्क पडले म्हणून मुख्याध्यापक बापाने बेदम मारलं, जखमी मुलीनं जीव सोडला तेव्हा बाप...
दारू आणि भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी गेली
मृत तरुणाचं नाव शुभम सुरडकर असं आहे, तर आरोपी वडील धनराज सुरडकर असं आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज हे पत्नी आणि दोन मुलांसह पिंपरी कसब्यात राहतात. त्यांचा मोठा मुलगा शुभम याचं लग्न झालं होतं, मात्र तो दारूच्या आहारी गेला होता. शुभमच्या दारूच्या व्यसनामुळे आणि त्याच्या मारहाणीला कंटाळून चारच दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. दारूच्या नशेत शुभम घरात आणि बाहेरही सतत भांडणं करायचा. त्यामुळे कुटुंबीय त्रस्त झाले होते.
घटना लपवण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत रचला डाव
शनिवारी रात्री, शुभमच्या त्रासाला कंटाळून धनराज यांनी त्याच्या डोक्यात मोठ्या दगडानं हल्ला केला. या प्रहाराने शुभमच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्या लपवण्यासाठी धनराज यांनी आपला धाकटा मुलगा गौरवच्या मदतीने मध्यरात्री शुभमचा मृतदेह फत्तेपूर-पिंपरी बायपास रोडवरील एका निर्जन ठिकाणी फेकला. त्यांनी ही हत्या अज्ञात व्यक्तीने केल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> मुंबई हादरली! 10 वर्षाच्या मुलीवर आईच्याच बॉयफ्रेंडनं केलं लैंगिक शोषण, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत व्हिडिओ बनवला
घराची झडती घेतल्यावर सगळं उघड
या घटनेनंतर घाबरलेल्या धनराज यांनी आपला भाऊ हिरालाल सुरडकर याला हा प्रकार सांगितला. मात्र, हिरालालने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाने तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी धनराज यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा संपूर्ण सत्य समोर आले.
पोलिसांनी धनराज, गौरव आणि हिरालाल या तिघांना ताब्यात घेतलं असून, फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.