Mira Road : तुकडे कुकरमध्ये शिजवणे, कुत्र्यांना टाकणे; हा राक्षसीपणा येतो कुठून?
श्रद्धा वॉलकर हत्याकांडाने बर्बरतेची परिसीमा ओलांडली. आफताबचे प्रकरण विस्मृतीत गेलेही नव्हते, तर मुंबईतील मीरा रोड हत्याकांडाने सगळ्यांची झोप उडवली.
ADVERTISEMENT

Mira Road News in Marathi : देशात आणि जगात दररोज हत्येच्या असंख्य घटना घडत आहेत. गोळ्या झाडणे, चाकूने किंवा कोणत्याही धारदार शस्त्राने हत्या करणे यासारख्या घटना तर इतक्या घडत आहे की, आता लोकही संवेदनाही झाल्यासारखं वाटतं आहे. पण, गेल्या काही काळात इतक्या क्रूर घडना घडल्या की, लोकांचा थरकाप उडाला. मग श्रद्धा वॉलकर हत्याकांडाने बर्बरतेची परिसीमा ओलांडली. आफताबचे प्रकरण विस्मृतीत गेलेही नव्हते, तर मुंबईतील मीरा रोड हत्याकांडाने सगळ्यांची झोप उडवली.
या घटनेतही आरोपीने सात वर्षांपासून सोबत राहणाऱ्या लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. ते तुकडे शिजवून कुत्र्यांनाही खाऊ घातले. गुन्हे करणाऱ्या लोकांची व्याख्या मानसशास्त्रात वेगळी केली जाते. यामध्ये घरची परिस्थिती, बालपण, शिक्षण, सामाजिक स्थिती, मानसिक स्थिती या सर्व गोष्टी जबाबदार असतात. पण, जेव्हा अशी प्रकरणे समोर येतात, ज्यामध्ये आरोपी ओळखीच्या माणसाच्या मृतदेहासोबत राक्षसी कृत्ये करतात, मनोरुग्णांचा दर्जा दिला जातो.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?
प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. विधी एम. पिलनिया म्हणतात की, “मृतदेहासोबत क्रूर कृत्ये करण्याच्या मानसिकतेला वेडेपणा म्हणावं लागेल. नेक्रोफिनिक प्रवृत्ती असलेले गुन्हेगार मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवण्यासारख्या गोष्टीही करतात.”
“मृतदेहासोबत अशी कृत्ये करतात जी क्रौर्याच्या परिसीमा ओलांडणारी असतात. जसे की, मृतदेहाचा कोणताही भाग खाणे, त्याचे तुकडे करणे, ते उकळणे, कुत्र्यांना खाऊ घालणे, फ्रीजमध्ये ठेवणे, ही सर्व लक्षणे अँटी सोशल पर्सनालिटी डिसऑर्डरची मानली जातात. समाजात अशा क्रूर घटना वाढल्या आहेत. मीडिया किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्याप्रकारे अशा बातम्या अधिक दिसत आहेत, त्यावरून समाजात क्रौर्य वाढल्याचे दिसून येते.”










