भयंकर! जिच्यासाठी इस्लाम स्वीकारला, नंतर तिच्याच डोक्यात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Murdered by a husband who converted to Islam for his wife by hitting his wife on the head with a hammer
Murdered by a husband who converted to Islam for his wife by hitting his wife on the head with a hammer
social share
google news

Mumbai Murder: मुंबईजवळील मुंब्य्रातील आंबेडकरनगरामध्ये (Mumbara Mumbai) एका हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करुन तिची हत्या (Wife Murder) केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (mumbai mumbra killed wife hitting head with hammer husband converted to Islam for his wife)

ADVERTISEMENT

आधी हिंदू नंतर इस्लाम

पोलिसांनी या घटनेचे कारण सांगताना म्हणाले की पत्नीची हत्या घरगुती वादातून झाली आहे. मृताच्या नवऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही हत्या झाल्यानंतर पोलिसांना तपासा दरम्यान समजले की, या प्रकरणातील आरोपी हा आधी हिंदू होता. मात्र जरीन नावाच्या मुलीबरोबर लग्न केल्यानंतर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. या दोघांनी 14 वर्षापूर्वी लग्न केले होते, त्यांना एक मुलगाही असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : लग्नाला आलेल्या 113 पाहुण्यांचा मृत्यू, नवरदेव-नवरी वाचले; काय घडलं?

माहेरी जावून हत्या

गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमधील वाद प्रचंड टोकाला गेला होता. त्यामुळे तो पत्नीपासून भिवंडीमध्ये विभक्त राहत होता. मृत पत्नीच्या नातेवाईकांनी सांगितले की, 27 डिसेंबर रोजी दुपारी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा पत्नीला मारण्यासाठी हातात हातोडा घेऊन तो तिच्या घरी गेला. घरी गेल्या गेल्या त्याने पत्नीवर हातोड्याने डोक्यात वार केला. त्यावेळी पत्नी जागीच ठार झाली. पत्नीवर वार करत असताना त्याची सासू मध्ये आली मात्र त्यांच्यावरही त्यांनी हल्ला केल्याने त्याही त्यामध्ये जखमी आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Nitesh Rane : “… असं बोलण्याआधी संजय राऊतला लाज वाटली पाहिजे”, राणे भडकले

बॉम्बची नागरिकांना भीती

पत्नीच्या डोक्यात हातोड्याचा वार करुन ठार केल्यानंतर त्याने बॅटरीचे सेल जोडून तो बॉम्ब असल्याचे सांगून परिसरातील लोकांना घाबरवायचा प्रयत्न करत होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी वेळी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT