Nagpur: बहीण-भावाला चिरडलं, संतप्त जमावाने ट्रकच पेटवला!
नागपूरमधील बिडगावमध्ये आज सकाळी भरधाव ट्रकने दोघां बहीण-भावाला चिरडल्याने संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला पांगवण्यात आले मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली.
ADVERTISEMENT
Nagpur Accident : नागपूरजवळील बिडगावमध्ये आज सकाळपासून प्रचंड ताणतणावाचे वातावरण पसरले होते. सख्ख्या बहीण-भावाला (Sister-Brother) ट्रकने चिरडल्याने संतप्त जमावाने ट्रक (Truck) पेटवून दिला. जागीच मृत्यू (Death) झाल्याने संतप्त जमावाने ट्रकला पेटवून देऊन जोरदार दगडफेकही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्यात आले. अपघातात ठार झालेल्या बहिणीचे नाव अंजली सैनी असून भावाचे नाव सुमित नंदलाल सैनी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
पेटवूनही झाली दगडफेक
ट्रकने दोघा बहीण-भावाला चिरलडल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. बहीण-भाऊ दोघंही दुचाकीवरून जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन दोघांना चिरडले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. ट्रक पेटवल्याने पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली.
हे ही वाचा >> राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेला फक्त 5 लोकं, महाराष्ट्रातून एकाच व्यक्तीला संधी!
संतप्त जमाव
भरधाव ट्रकने दोघा भावंडाना चिरडल्यानंतर बिडगाव परिसरात ताणतणाव पसरला होता, बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाल्याने आणि निष्काळजीपणे ट्रक चालवल्यामुळे लोकांनी दगडफेक करून ट्रक पेटवून देण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर अग्निशमन दलाला बोलवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या दुर्घटनेच ट्रक जळाला आहे.
हे वाचलं का?
ट्रक कचऱ्याचा
संतप्त झालेल्या नागरिकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, ज्या ट्रकने बहिणभावांच्या दुचाकीला धडक दिली होती, तो कचरा टाकण्याचे काम करत होता. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा >> Crime: रक्ताच्या चिळकांड्या अन् दगडाने ठेचलेला मृतदेह; शौचालयात अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT