नागपूर हादरलं! नवऱ्याने सोन्यासारख्या बायकोचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप, परिसर हादरला

योगेश पांडे

Nagpur Crime News : नागपूरच्या मानकापूर येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी म्हणून मृत महिलेच्या नवऱ्याला अटक केली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

Nagpur Crime News
Nagpur Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

यामिनीचा मानकापुर येथे अकस्मित मृत्यू

point

शवविच्छेदनाच्या अहवालातून धक्कादायक 

Nagpur Crime News : नागपूरच्या मानकापूर येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी म्हणून मृत महिलेच्या नवऱ्याला अटक केली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पीडितेचा गळा दाबून तिला संपवल्याचे उघडकीस आले. मृत महिलेची यामिनी कृष्णलाल यादव (वय 38) अशी ओळख समोर आली. तर आरोपी नवरा कृष्णलाल शिवराम यादव (वय 41) अशी ओळख समोर आली, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : बारामती: 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या छतावरून उडी, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत

यामिनीचा मानकापुर येथे अकस्मित मृत्यू

यामिनी ही नागपूरच्या मानकापुर येथील एका झिंगाबाई टाकळी येथील एका गोंविंद सिटी टॉवर येथे राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता यामिनीचा मृत्यू झाला. सुरूवातीला मानकापुर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

शवविच्छेदनाच्या अहवालातून धक्कादायक 

यानंतर, मेयो रुग्णालयातील महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदनाच्या अहवालात महिलेचा गळा दाबून हत्या केल्याचा खुलासा करण्यात आला होता. महिलेच्या शरीरावर जखमा देखील आढळून आलेल्या आहेत. यानंतर मृत महिलेचा थोरला भाऊ राजेंद्र यादवने पोलीस ठाण्यात नवरा कृष्णलाल यादवविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा : किल्ल्यावर केक कापला, नंतर 3 चिमुकल्यांना खाली फेकलं अन् स्वत: मारली उडी, Gold मेडल Winner अश्विनीने का केलं असं?

पोलिसांनी आरोपी नवरा कृष्णलाल शिवराम यादवला अटक केली. पोलिसांच्या तपासानुसार आरोपीवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.