नागपूर : 17 वर्षीय मुलीकडून 45 वर्षीय वडिलांची हत्या, नेमकं काय घडलं?

योगेश पांडे

Nagpur crime news : नागपुरात 17 वर्षीय मुलीने वडिलांच्या डोक्यात लाकडी बॅटने वार केल्याची घटना समोर आली आहे. गंभीर दुखापतीनंतर 45 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Nagpur crime news
Nagpur crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नागपूर : 17 वर्षीय मुलीकडून 45 वर्षीय वडिलांची हत्या

point

नेमकं काय घडलं?

Nagpur Crime News : नागपुरात 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या 45 वर्षीय वडिलांच्या डोक्यात लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव जयपाल बारेलाल खोलपिटणे असे आहे. या घटनेमुळे पिता-मुलीच्या नात्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी 17 वर्षीय मुलीला आपल्या देखरेखीखाली घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ राडा

वडिलांच्या दारू पिण्यामुळे कुटुंबात अनेकदा वाद 

पोलिसांच्या माहितीनुसार, जयपाल यांना दारूचे व्यसन होते. त्यांच्या दारू पिण्यामुळे कुटुंबात अनेकदा वाद होत असल्याचे समोर आले आहे. जयपाल यांची पत्नी लोकांच्या घरात घरकाम करते, तर त्यांची 17 वर्षीय मुलगी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या कुटुंबात एक लहान मुलगाही आहे. घटनेच्या रात्री जयपाल हे दारूच्या नशेत घरी आल्याचा आरोप कुटुंबीयांच्या तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांसाठी वाहतुकीची मोठी सोय! बस, टॅक्सी, रिक्षासह अनेक पर्याय