Crime: दिराचं भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह…; खुनाचं कारण आलं समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

nalanda sister in law beaten to death by brother in law for illegal relationship and money bihar crime story
nalanda sister in law beaten to death by brother in law for illegal relationship and money bihar crime story
social share
google news

बिहारच्या (Bihar) नालंदात एका दिराने वहिनीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. आशा देवी असे या महिलेचे नाव आहे. हत्येनंतर दिराने (brother in law) वहिनीचा (sister in law)  मृतदेह फासावर लटकवला होता. जेणेकरून पोलिसांना (police) ही घटना हत्या नव्हे तर आत्महत्या वाटावी, यासाठी त्याने हे कृत्य केले होते. दरम्यान पोलिसांनी आता घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच आता पोलिसांनी आरोपी दीरासह कुटुंबाचा शोध सुरु केला आहे. (nalanda sister in law beaten to death by brother in law for illegal relationship and money bihar crime story)

नूरसराय पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या आशा देवी हिचे लग्न 6 वर्षापुर्वी जहानाबाद क्षेत्रातील ओखरी गावात राहणाऱ्या अर्जुन रविदास यांच्याशी झाले होते. आशा आपल्या कुटुंबासह अजनौरा गावात भाड्याने राहायची. आशा आणि अर्जुनचा सुखी संसार सुरू होता. या दरम्यान दोन दिवसांपुर्वीच आशा गावी परतली होती. या दरम्यान आशाच्या दिराने तिला गावातील एका व्यक्तीसोबत बोलताना पाहिले होते.या गोष्टीचा दिराला फार राग आला होता. या रागातून दिराने वहिनीला जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादातून दिराने वहिनीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वहिनीचा मृ्त्यू झाला. या मारहाणीचा आरोप आपल्या माथी य़ेऊ नये यासाठी दिराने वहिनीचा मृतदेह फासावर लटकला होता. हा संपूर्ण प्रकार करून दिराने कुटुंबासह गावातून पळ काढला होता.

हे ही वाचा : Crime: शेजारणीवर बलात्कार, आरोपीच्या बायकोने तर पीडित महिलेसोबत केलं भयंकर कृत्य…

दरम्यान या हत्येनंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती आशाच्या कुटुंबियांनी दिली होती. यानंतर आशाच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिरावर गंभीर आरोप केला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून दिराने ही हत्या केली आहे.या हत्येनंतर दिराने महिलेचा मृतदेह फासावर लटकवला आहे, जेणेकरन हे प्रकरण आत्महत्येचा वाटावे, असा आरोप वडिलांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणावर नूरसराय पोलीस ठाण्याचे प्रमुख कुणाल चंद्र सिंह म्हणाले की, महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टमनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे, असे कुणाल चंद्र सिंह म्हणाले आहेत. वडिलांनी महिलेच्या दिरावर हत्येचा आरोप केला आहे. सध्या महिलेच्या सासरचे सर्व कुटुंब गावातून फरार आहे.या कुटुबियांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

    follow whatsapp

    ADVERTISEMENT