Nashik Crime : शेजाऱ्यासोबचा वाद विकोपाला, बाप-बेट्यांनी खून केला, मृताचं शीर कापून थेट पोलीस स्टेशनमध्येच...

मुंबई तक

सुरेश बोके या 40 वर्षाच्या आरोपीने आणि त्यांच्या मुलाने शेजारी असलेल्या गुलाब रामचंद्र वाघमारे यांची कुऱ्हाडीने आणि विळ्याने हल्ला करत खून केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

बाप-बेट्यानं क्रुरतेच्या सीमा पार केल्या, नाशिक हादरलं

point

शेजाऱ्यांंसोबतचा वाद विकोपाला, थेट हत्या करत संपवलं

point

हत्या करूनच थांबले नाही तर नंतर शीर कापून थेट...

Nashik Crime news : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात एका बापाने आपल्या मुलासह शेजाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाप-बेटे एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी मृताचं छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या शरिराचं शीर कापलं आणि ते घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी आरोपीला अटक असून, त्याच्या मुलालाही ताब्यात घेतलं आहे.

एका अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलं की, ही घटना दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेतलं, मात्र त्याच्या वयाबद्दलची पडताळणी सुरू आहे असं पीटीआयच्या वृत्तामधून समोर आलंय. 

हे ही वाचा >> Beed : बीडमध्ये पुन्हा तशीच घटना, माजी सरपंचाला उचललं, डांबून ठेवलं, पायात कुलूप असलेल्या अवस्थेत...

सुरेश बोके या 40 वर्षाच्या आरोपीने आणि त्यांच्या मुलाने शेजारी असलेल्या गुलाब रामचंद्र वाघमारे यांची कुऱ्हाडीने आणि विळ्याने हल्ला करत खून केला. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या घटनेनंतर दोन्ही आरोपी मृताचं शीर आणि हत्येसाठी वापरलेली शस्त्रं घेऊन थेट ननाशी पोलीस स्टेशनला पोहोचले. 

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एवढा संताप निर्माण झाला की, जेव्हा स्थानिक लोकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा, त्यांनी आरोपी पिता-पुत्राच्या घराची तोडफोड करतत्यांची कारही पेटवून दिली.

हे वाचलं का?