'मित्रा, तू असं का केलंस?' बायकोसोबत अनैतिक संबंध, शेवटी...

मुंबई तक

अनेक वर्षांपासूनची घनिष्ठ मैत्री. मात्र या मैत्रीत एका कारणावरुन वितुष्ट येते अन् पुढं एक जणाचा जीव जातो. काय आहे ही घटना, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

'मित्रा, तू असं का केलंस?'

point

बायकोसोबत अनैतिक संबंध

point

शेवटी...

Crime News : बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी मुख्य आरोपीला मुंबई येथून अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह हस्तगत केला असून, आता पोलीस या संपूर्ण गुन्ह्याची साखळी जोडण्यात आणि पुढील पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील ही घटना आहे.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

बिरेंद्र बेहरा असे या मृत व्यक्तीचे नाव असून, तो बालासोर जिल्ह्यातील जमुना गावचा रहिवासी होता. पोलिसांच्या माहितीनुसार, बिरेंद्र 31 मे रोजी त्याचा मित्र बिरेन मढेई याच्यासोबत डंपर चालक म्हणून काम करण्यासाठी शेजारील मयूरभंज जिल्ह्यात गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबाने त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण काहीही पत्ता न लागल्याने चिंतेत असलेली त्याची पत्नी सावित्री बेहरा हिने पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करत बिरेंद्रच्या संपर्कातील लोकांकडे चौकशी सुरू केली, ज्यामध्ये पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.

हे ही वाचा : Personal Finance: 'ही' कागदपत्रं नसतील तर चुकूनही खरेदी करू नका Resale Flat!

बायकोशी अनैतिक संबंधांचा संशय

पोलीस तपासात समोर आले आहे की, बिरेंद्र बेहरा आणि बिरेन मढेई हे दोघे जुने व चांगले मित्र होते आणि दोघेही अनेकदा राज्याबाहेर जाऊन काम करायचे. परंतु, बिरेंद्रचे बिरेनच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले. हा वाद इतका वाढला की, तो मिटवण्यासाठी गावातील समितीसमोर (पंचायत) बैठकही झाली होती. गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी हस्तक्षेप करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये 50 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता. मात्र, या तडजोडीनंतरही बिरेनच्या मनातील राग आणि तणाव शांत झाला नव्हता.

हे ही वाचा : पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली..

हत्या करुन गाठली मुंबई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरेनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर आणि बिरेंद्रसोबतच्या संबंधांवर संशय होता. याच रागातून त्याने बिरेंद्रला बोलावून घेऊन 25 मे रोजी त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह जंगलात गाडून टाकला आणि तो मुंबईला पळून गेला. तांत्रिक पुरावे आणि संशयाच्या आधारे पोलिसांनी बिरेनचा माग काढत त्याला मुंबईतून बेड्या ठोकल्या. ओडिशात आणून केलेल्या कडक चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याच्या सासरच्या घराजवळील परिसरातून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला, ज्यामुळे या हत्याकांडाचा संपूर्ण उलगडा झाला.

हे वाचलं का?