मृतावर गोळीबार, सर्जिकल ब्लेडने केल्या जखमा, सुनेचा बदला घेण्यासाठी सासऱ्याने असा रचला कट
मुलाची बायको वाद घालून माहेरी निघून गेल्यावर सासऱ्याने तिचा बदला घेण्याचा कट रचला. मात्र त्यांच्या हा कट जास्त काळ टिकून राहिला नाही. पिता पुत्राची चौकशी सुरु केल्यानंतर मात्र त्यांच्या बोलण्यात विसंगती जाणवली आणि त्यांचे पितळ उघडं पडलं.
ADVERTISEMENT

UP Crime : एखादी व्यक्ती एखाद्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी काय-काय करू शकते त्याचा एक नमुना उत्तर प्रदेशातील एटामध्ये (Uttar Pradesh Etah) घडला आहे. एटामधील एका सासऱ्याने आपल्या सून आणि तिच्या कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी एक मोठा कट (Murder Plan) रचला होता. मात्र त्याचा तो कट फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्याचा तो प्रकार उघडकीस आणत त्याचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणला आहे.
जीवघेणा हल्ला
एटामधील जैथरा पोलीस स्टेशनमध्ये 11 नोव्हेंबर रोजी दीपक नावाच्या व्यक्तीने एक गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, ते पारोळीचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, 6-7 लोकांनी वडील सुरेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. तर त्यांच्या मामाचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दीपकने आपल्या सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आणि जीवघेणा हल्ला चढविल्याचा आरोप केला होता.
पिता-पुत्राच्या बोलण्यात फरक
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासही सुरू केला. त्यानंतर मात्र पिता-पुत्राच्या बोलण्यात सातत्याने बदलत जाणवत गेला. त्यामुळे त्यांच्यावरच पोलिसांनी संशय व्यक्त केला. संशय बळावल्याने पोलिसांनीही त्यांची कसून चौकशी सुरु केली. चौकशीनंतर मात्र त्यांना समजलं की, सुनेचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा कट रचला आहे. या प्रकरणात एका डॉक्टरचाही समावेश असल्याने त्यालाही आता अटक करण्यात आली आहे.
खोट्या गुन्ह्यासाठी केला गोळीबार
पोलिसांनी त्यानंतर चौकशीला सुरुवात केल्यानंतर दीपकने सांगितले की, 2019 मध्ये त्याचे लग्न झाले होते. मात्र त्याच्या पत्नीचे त्यांच्याच नात्यातील मुलासोबत अफेअर सुरू झाले होते. हे प्रेमप्रकरण दीपकला समजल्यानंतर त्याने पत्नीला त्याचा जाबही विचारला होता. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वादही झाले होते. तर त्याच कारणावरून त्यानंतर दीपकची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. ती माहेरी गेल्यानंतर तिला वारंवार फोन करूनही ती आली नसल्याने पत्नीविरुद्ध दीपकने न्यायालयात खटला दाखल केला. ही खटला चालू असतानाच दीपकच्या वडिलांच्या मनात विचार आला की, षडयंत्र रचून सासरच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात का अडकवू नये आणि तसा सल्लाही वडिलाने आपल्या मुलाला दिला.