परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने आई-वडील ओरडले, नैराश्यातून 10 वीच्या विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या...
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आई-वडील ओरडले आणि त्यामुळे मानसिक तणावाने ग्रस्त असलेल्या 10 वीच्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने आई-वडील ओरडले...
नैराश्यातून 10 वीच्या विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या...
Suicide Case: सध्याच्या काळातील मुले अभ्यास आणि त्यातून यश मिळवण्यासाठी पालकांच्या अपेक्षांच्या दबावाखाली जगत असल्याचं पाहायला मिळतं. शैक्षणिक प्रगतीला अनुसरून कुटुंबियांच्या अपेक्षा त्यांना तणावग्रस्त वाटू लागतात. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यावर पालकांचा मिळणारा ओरडा यासारख्या लहानसहान गोष्टींमुळे सुद्धा त्यांच्यावर तणाव निर्माण होऊ शकतो.अशातच, जर आजच्या काळातील मुलांना वेळीच समजावलं नाही तर, ती टोकाचं पाऊल उचलू शकतात.
विद्यार्थीनीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या...
हैदराबाच्या हब्सिगुडा परिसरातून अशीच एक दु:खद घटना समोर आली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. येथील श्री चैतन्य शाळेत 10 वीत शिकणाऱ्या वैष्णवी नावाच्या विद्यार्थिनीने ती राहत असलेल्या अपार्टमेंटच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गांधी रुग्णालयात नेण्यात आला.
हे ही वाचा: मुंबईतील वृद्ध जोडप्याची तब्बल 4.5 कोटी रुपयांची फसवणूक! सरकारी सील असलेल्या बनावट नोटिस अन् व्हिडीओ कॉल...
मानसिक तणावातून टोकाचं पाऊल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे पालक तिला नुकत्याच झालेल्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याबद्दल खूप ओरडले असल्याचं कुटुंबियांच्या जबाबावरून आणि प्राथमिक तपासावरून स्पष्ट होत आहे. याच गोष्टीमुळे पीडित विद्यार्थिनीचा मानसिक ताण वाढला आणि त्यामुळेच वैष्णवीने हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या पोलीस पीडितेच्या शेजारील लोक, शाळेतील शिक्षक आणि कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवत असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांसाठी 3 नव्या उड्डाणपुलांची निर्मिती, विमानतळाशी थेट कनेक्शन अन्... लवकरच होणार कायापालट!
पालकांसाठी सल्ला
या प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाबाबत स्थानिकांचं म्हणणं आहे की ही दुःखद घटना मुलांवरील वाढत्या दबावाचे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचं उदाहरण आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना योग्य गोष्टींमध्ये सपोर्ट केला पाहिजे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून त्यांना तणावातून मार्ग दाखवला पाहिजे.










