लग्नानंतर आले नाहीत Periods आणि झाली प्रेग्नंट; म्हणाली, "माझ्या सख्ख्या भावानेच माझ्यासोबत...."
लखनऊच्या पारा क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला लाज वाटावी, अशा या घटनेने सर्वांनाच चकित करुन सोडलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला लाज आणणारी घटना

बहिणीने केला भावाने जबरदस्ती केल्याचा आरोप

लग्नानंतर काही दिवसातच बायको प्रेग्नंट
Lucknow Crime News: उत्तर प्रदेशाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊच्या पारा क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला लाज वाटावी, अशा या घटनेने सर्वांनाच चकित करुन सोडलं आहे. या घटनेतील तरुणीने तिच्या भावावर 1 एप्रिलच्या रात्री झोपल्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध बनवण्याचा आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, याबद्दल कोणाला सांगितल्यानंतर तिला मारण्याची धमकी सुद्धा तिच्या भावाने दिली. मुलीच्या लग्न झाल्यावर ती सासरी गेल्यानंतर ही घटना समोर आली. आता, पोलिसांना आरोपी भावाला अटक करुन त्याच्यावर कारवाई केली आहे.
तरुणीने सांगितली सर्व कहाणी
तरुणीच्या मते, जेव्हा तिने हे सर्व तिच्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी मुलीला याबद्दल कोणालाच काही न सांगण्यास आणि गप्प राहण्यास सांगितले. आरोपी भावाने तिला धमकीही दिली की जर तिने हे कोणाला सांगितले तर तो तिला मारून टाकेल. भीती आणि दबावामुळे ती मुलगी गप्प राहिली.
हे ही वाचा: कपलला अडवलं, खोट्या केसची धमकी देत लाच मागितली, पुढे असं काय घडलं की तीन पोलिसांनाच निलिंबित केलं?
दबरदस्तीने लावलं लग्न
मुलीने सांगितल्याप्रमाणे, 15 एप्रिलला तिचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. मात्र, लग्नानंतर जेव्हा तिला मासिक पाळी आली नाही तेव्हा तिची मेडिकलमध्ये तपासणी करण्यात आली. या टेस्ट्समध्ये ती 5 आठवडे आणि 2 दिवसांपासून गर्भवती असल्याचं समोर आलं. हे ऐकून सासरची मंडळींना मोठा धक्का बसला आणि यासंबंधी त्यांनी मुलीच्या आईला सांगितलं. आता मुलीच्या माहेरचे लोकांनी सासरच्या मंडळींना हुंडा प्रकरणात अडकवणार असल्याची धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे.
हे ही वाचा: Personal Finance: बँकांनी FD व्याजदर कमी केल्याने नुकसान? टेन्शन घेऊ नका.. 'या' नियमामुळे होईल फायदा!
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कारासह गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी भावाची तुरुंगात रवानगी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.