प्लंबरने आधी वृद्ध दाम्पत्याने स्क्रू ड्रायव्हरने भोकसून संपवलं...नंतर मोलकरणीकडे गेला अन्

मुंबई तक

Crime News : अवघ्या 300 रुपयांच्या पैशांवरून झालेल्या वादातून वृद्ध दाम्पत्यासह घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी प्लंबर राजकुमारला अटक केली असून तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्लंबरने आधी वृद्ध दाम्पत्याने स्क्रू ड्रायव्हरने भोकसून संपवलं..

point

नंतर मोलकरणीकडे गेला अन्

Crime News : अवघ्या 300 रुपयांच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका प्लंबरने वृद्ध दाम्पत्यासह घरकाम करणाऱ्या महिलेची चाकूने हत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून पोलिसांनी राजकुमार नावाच्या आरोपीला अटक केली आहे. या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. सुरुवातीला ही हत्या लुटीच्या उद्देशातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तपासात 300 रुपयांच्या देयकावरून झालेला वाद आणि त्यानंतरचा हल्ला यावर पोलिसांचा भर आहे.

स्क्रू ड्रायव्हरने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. एस. कपूर (80) आणि त्यांच्या पत्नी रजनी कपूर (76) यांच्या घरी राजकुमार मागील दोन वर्षांपासून प्लंबर म्हणून काम करत होता. मंगळवारी तो कपूर दाम्पत्याच्या घरी प्लंबिंगचे काम करण्यासाठी गेला होता. काम पूर्ण झाल्यानंतर 300 रुपयांच्या पैशांवरून राजकुमार आणि कपूर दाम्पत्यामध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर राजकुमारने स्क्रू ड्रायव्हरने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना डेहराडून येथे घडली. 

हेही वाचा : MPSC आंदोलनाबाबत हायकोर्टातून मोठी अपडेट, न्यायालयाचं विद्यार्थ्यांना आवाहन, सरकारला निर्देश

दरम्यान, शेजारील घरात काम करणाऱ्या टिलिया देवी (55) यांना घरातून आरडाओरड ऐकू आली. त्यानंतर त्या घटनास्थळी धावून गेल्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असलेल्या टिलिया देवी यांनाही गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात कपूर दाम्पत्य आणि टिलिया देवी असे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी राजकुमारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.