अनैतिक संबंध ठेवणं महिलेला कायमची अद्दल घडवून गेलं, बॉयफ्रेंडने असं काही केलं की...

मुंबई तक

बिहारची राजधानी पाटणामध्ये एम्सच्या सुरक्षारक्षकाच्या दोन मुलांना दिवसाढवळ्या जाळून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संतापजनक घटनेमागे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

poured kerosene on the children and mercilessly killed them The mothers boyfriend did it through an immoral relationship
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संंबंधातून दोन मुलांची निर्घृणपणे हत्या

point

महिलेच्या प्रियकरानेच मुलांना रॉकेल ओतून जाळलं अन्...

Crime News: बिहारची राजधानी पाटणा येथील जानीपुर पोलीस स्टेशन परिसरात हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एम्सच्या सुरक्षारक्षकाच्या दोन मुलांना दिवसाढवळ्या जाळून मारण्यात आले. या संतापजनक घटनेमागे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच खरं कारण समोर येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.

आईच्या प्रियकराने केली मुलांची हत्या...

मिळालेल्या माहितीनुसार, शोभा देवी नावाची माहिती एम्स गार्ड म्हणून कार्यरत असून तिचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. मात्र, काही कारणास्तव शोभा देवी आणि तिच्या प्रियकरामध्ये अंतर निर्माण झाले. याच कारणामुळे महिलेच्या प्रियकराने तिच्या दोन मुलांची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रकरणातील आरोपींनी शोभा देवीची 14 वर्षांची मुलगी अंजली कुमारी हिच्या तोंडात कापड कोंबले आणि तिचा मुलगा अंशच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या शरीरावर रॉकेल ओतलं आणि त्या दोघांना निदर्यीपणे जाळून हत्या केली. 

हे ही वाचा: विवाहित पुरुषाचे लिव्ह इन पार्टनरसोबत संबंध, पण पत्नी आजारी अन् पार्टनरला खटकली 'ती' गोष्ट मग थेट...

दोन्ही मुलांना जाळून...

दोन्ही मुलांना जाळून त्यांचा मृत्यू होईपर्यंत आरोपी घरातच असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी आरोपी अंजलीला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंशने पाहिलं. जर अंश जिवंत राहिला तर तो पोलिसांना सर्व काही सांगून टाकेल अशी आरोपींना भिती होती, म्हणून सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी अंशचीही निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 

पोलिसांचा तपास 

पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर चार आरोपींचा तपास सुरु असल्याची माहिती आहे. पोलीस लवकरच संपूर्ण प्रकरण उघडकीस आणणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  हत्येपूर्वी आरोपींनी अंजलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी व्हेजाइनल स्वॅब आणि जळालेले साहित्य एफएसएलमध्ये पाठवले असून अंजलीचे कपडेही एफएसएल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp