अतीक-अशरफ हत्येच्या 3 तासापूर्वी काय घडलेलं?, अंगावरा काटा आणणारी कहाणी
अतिक अहमद आणि अशरफच्या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तर रात्री साडे सात ते साडे दहा या 3 तासांमध्ये? काय घडलं 3 तासांमध्ये?
ADVERTISEMENT

Atiq Ashraf murder case:
प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये (Prayagraj) गेल्या शनिवारी म्हणजेच 15 एप्रिल रोजी कॅमेरासमोर अशी घटना घडली ज्याने अवघा देशच हादरुन गेला. माफिया आणि माजी खासदार अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या गरड्यातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतीक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही हत्या करण्यात आली होती. यावेळी तीन शूटर्सने मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच गोळ्या झाडून दोन्ही भावांची हत्या तर केलीच, शिवाय यूपी पोलिसांना देखील एक प्रकारे आव्हान दिले. (All serious questions of Atiq Ahmed and Ashraf are answered in 3 hours from 7:30 PM to 10:30 PM.)
पोलिसांच्या ताब्यात असतानाही अतीक अहमद आणि अशरफ यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्यावरुन काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पण या सर्व गंभीर प्रश्नांचे उत्तर रात्री साडे सात ते साडे दहा या 3 तासांमध्ये असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे या 3 तासांमध्ये नेमकं काय घडले हे पाहणे महत्वाचे आहे. याचबाबत आज तकचे प्रतिनिधी आणि घटनेचे प्रत्यक्षदर्शी समर्थ श्रीवास्तव यांनी त्या 3 तासांमध्ये काय काय घडले याबाबत सविस्तर माहिती समोर आणली आहे.
मारेकरी अतीक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडताना ‘तो’ चौथा व्यक्तीही होता हजर?
शनिवार – 15 एप्रिल 2023 :
अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराजमधील धुमनगंज पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. इथेच दोघांची चौकशी सुरू होती. अतिक आणि अशरफ हे दोघेही शुक्रवारी संपूर्ण रात्र झोपले नव्हते. दोघेही सतत असदच्या दफनविधीची माहिती घेत होते. अशरफ आणि अतिक यांना ठेवण्यात आलेल्या धुमनगंज पोलिस ठाण्यापासून असदचे अत्यंविधी झालेल्या कासारी-मासारी स्मशानभूमीचे अंतर 5 किलोमीटर आहे. मुलाच्या अंत्यसंस्काराची बातमी आल्यानंतर शनिवारी दिवसभर अतिक आणि अशरफ एकाच पोलीस ठाण्यात होते. यादरम्यान दोघांची चौकशी करण्यात आली.