कृत्रिम दातामुळे जीवाला धोका! महिलेसोबत घडला सर्वात भयंकर प्रकार..डॉक्टरांनाही बसला मोठा धक्का

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका 60 वर्षांच्या महिलेसाठी तिचा नकली दात आरोग्यासाठी धोकादायक ठरला.

Today Shocking Viral News
Today Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नकली दात खतरनाक का असतात?

point

डॉक्टर महिलेबाबत काय म्हणाले?

point

नकली दातामुळे त्या महिलेचं आरोग्य धोक्यात कसं आलं?

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका 60 वर्षांच्या महिलेसाठी तिचा नकली दात आरोग्यासाठी धोकादायक ठरला. जेवण करताना महिलेचा नकली दात फूड पाईपमध्ये अडकला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. महिलेला तीव्र वेदना झाल्यामुळे कुटुंबातील लोक घाबरले. त्यानंतर महिलेला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान, महिलेची प्रकृती ठीक असल्याचं म्हटलं जात आहे. 

महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी तिला नारायण स्वरुप हॉस्पीटलमध्ये एडमिट केलं. तपासात समोर आलं की, नकली दात गळ्यातील नलिकेत खोलपर्यंत अटकला. जर थोडाही उशिर झाला असता, तर श्वसन नलिका बंद झाली असती आणि रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. हॉस्पिटलचे डॉक्टर राजीव सिंह यांच्यासोबतच वरिष्ठ डॉक्टरांनी महिलेच्या अन्न नलिकेतून दात बाहेर काढला. जवळपास एक तासांच्या या कठीण प्रक्रियेनंतर रुग्णाचा जीव वाचला आणि ती आता पूर्णपणे ठीक आहे. 

हे ही वाचा >> मुंबईत हळहळ! भूतबाधा झाल्याचं सांगत भोंदू बाबानं पीडितेला उपचारासाठी बोलावलं, नंतर महिलेवर करत राहिला बलात्कार अन्...

नकली दात खतरनाक का असतात?

जर नकली दात किंवा दंत उपकरण खराब झालं, तर ते अन्ननलिका किंवा श्वसन नलिकेत अडकतं. अशा परिस्थितीत दम लागण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर नकली दात पोटापर्यंत पोहोचला, तर तो आतड्यांनाही गंभीर दुखापत करू शकतो. 

डॉक्टरांनी काय म्हटलं?

डॉ. राजीव सिंह यांनी म्हटलं की, रुग्णाची प्रकृती गंभीर होती. जर उशिर झाला असता, तर श्वसननलिका बंद झाली असती. आमच्या टीमने सावधपणे एंडोस्कोपीद्वारा नकली दात बाहेर काढला. रुग्ण आता धोक्याच्या बाहेर आहे. डॉ. राजीव सिंह यांनी लोकांना सूचना दिली की, नकली दात लावल्यानंतर नियमित फिटिंगची तपासणी करा. जर दात खराब झाले, तर तातडीनं दंत चिकित्सकला दाखवा. 

हे ही वाचा >> मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात

हे वाचलं का?

    follow whatsapp