हत्येच्या काही सेंकद आधी अतिक अहमदने कोणाला केला होता इशारा? Video व्हायरल
अतिक अहमदचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हत्येपूर्वी अतीक अहमद कोल्विन हॉस्पिटलच्या गेटवर पोलिस जीपमधून खाली उतरताना क्षणभर थांबल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
ADVERTISEMENT
अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता 3 शूटर्सभोवती फिरत आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींची 4 दिवसांची कोठडी मागून घेतली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी तिन्ही आरोपींकडे 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत आरोपींनी काही महत्वाचे आणि मोठे खुलासेही केले असल्याची माहिती आहे. याच जबाबाच्या आधारावर एसआयटी तपास पुढे नेत आहे. पहिल्या दिवशी पहिल्या 24 तासात आरोपींनी काय सांगितले आणि तपास यंत्रणेची पुढील योजना काय आहे? हे सांगणारा खास रिपोर्ट.
ADVERTISEMENT
5 दिवसांपूर्वी प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटल कॅम्पसमध्ये अतिक अहमदची हत्या करण्यात आली आहे. आता या हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रयागराज पोलिसांना खूप जोर लावावा लागत आहे.
अतीक अहमदच्या नावाने भाजपचा आमदार मागतोय मतं, म्हणतोय बघा…
3 शूटर्सनी 7 सेकंदात 18 गोळ्या झाडून अतिक आणि अशरफ यांची हत्या केली. हे तिघे कोण आहेत? त्यांचा हँडलर कोण आहे? अतिक आणि अशरफ यांची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? गेल्या 5 दिवसांपासून उत्तर प्रदेशचे पोलीस आणि एसआयटी हे प्रश्न सोडवत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे हत्येच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्याचे.
हे वाचलं का?
व्हायरल व्हिडिओचीही चौकशी सुरू आहे :
अतिक अहमदचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हत्येपूर्वी अतीक अहमद कोल्विन हॉस्पिटलच्या गेटवर पोलिस जीपमधून खाली उतरताना क्षणभर थांबल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. खाली उतरण्यापूर्वी आतिकचा एक पाय कारमध्ये होता. तो जीपच्या बाजूला उभा होता, तेवढ्यात त्याची नजर हॉस्पिटलकडे गेली. सुमारे चार सेकंद तो तिथे पाहत राहिला. यानंतर त्याने मानेनी इशारा केला आणि मग गाडीतून खाली उतरला. यानंतर तो हॉस्पिटलच्या आवारात पोहोचताच हल्लेखोरांनी मीडिया कर्मचारी असल्याचे भासवून गोळीबार केला. डोके हलवण्यापासून गोळीबारापर्यंतची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता प्रश्न असा आहे की ती व्यक्ती कोण होती, ज्याला पाहून अतिक अहमदने मान हलवली.
Atiq Shooter Interrogation : ‘मी कट्टर हिंदूवादी आणि परशुरामाचा वंशज’, चौकशीत आरोपी लवलेशचा खुलासा
आरोपी खुलासा नंबर -1
अतिक अहमद आणि अश्रफ यांच्यावर 3 नेमबाजांनी एकाच वेळी काही सेकंदात गोळीबार केला. अशात आता पोलिसांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या तिघांच्या टोळीचा लिडर कोण होता? पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवसाच्या चौकशीत मिळालेल्या माहितीमध्ये सनी सिंग माफिया सुंदर भाटी टोळीच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. हमीरपूर तुरुंगात असताना सनी सिंग सुंदर भाटी टोळीच्या संपर्कात आला. सनी सिंगनेच लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य यांना या कटात सामील केले होते.
ADVERTISEMENT
खुलासा नंबर – 2
अतिक आणि अशरफच्या शूटरकडे सापडलेल्या लाखो रुपयांच्या जिगाना पिस्तुलाबाबतही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटर अरुण मौर्याने सांगितले की, त्याला ही पिस्तूल पानिपतच्या मित्राने दिली होती.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान जिगाना पिस्तूल एवढी महागडी असते हे अरुणला माहित नव्हते. पण यातून गोळी सुटली की माणूस जिवंत राहत नाही हे पक्के माहित होते. शूटर सनी सिंहने सांगितले की, त्याला जिगाना पिस्तूल दिल्लीच्या एका गँगस्टरने दिलं होतं. त्याची डिसेंबर 2021 मध्ये हत्या झाली. सनीची आणि त्या गँगस्टरची मे २०२१ मध्ये भेट झाली.
अतीक-अशरफ हत्येच्या 3 तासापूर्वी काय घडलेलं?, अंगावरा काटा आणणारी कहाणी
खुलासा नंबर – 3
या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींची पोलिस कोठडीत पहिल्याच दिवशी सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत समोर आलेला एक मोठा खुलासा म्हणजे 14 एप्रिलला अतिक अहमदलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिस कोठडीसाठी कोर्टात सुनावणीसाठी जात असताना आजूबाजूला हल्लेखोर हजर होते, मात्र अत्यंत कडेकोट बंदोबस्त पाहून हल्ल्याचा बेत पुढे ढकलण्यात आला.
खुलासा नंबर – 4
शूटर सनी सिंगने सांगितले की, आपण कोणासाठीही काम करत नाही, स्वत: डॉन आहे. पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण अतिक-अश्रफची हत्या केली. शूटर लवलेश तिवारीने सांगितले की तो कट्टर हिंदू आहे आणि प्रसिद्ध होण्यासाठी त्याने अतिक-अश्रफची हत्या केली. शूटर अरुण मौर्याने सांगितले की, अतिक आणि अशरफची हत्या करून त्याला भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळवायची होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT