पुणे : लग्नात 45 लाखांचा खर्च, 10 तोळे सोने भेट; तरीही वैष्णवीची आत्महत्या कशामुळे?
Pune Crime News : लग्नासाठी 45 लाख रुपये खर्च आणि 10 तोळे सोने दिल्यानंतरही कारसाठी 5 लाखांची मागणी केल्याचा मृत महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. पुण्यात लग्नाच्या चार महिन्यांनंतर 24 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : लग्नात 45 लाखांचा खर्च, 10 तोळे सोने भेट;
तरीही इंजिनिअर वैष्णवीची आत्महत्या कशामुळे?
Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतर 24 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीये. हुंड्याच्या मागणीवरून पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला गेल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नासाठी कुटुंबीयांनी सुमारे 45 लाख रुपये खर्च केले होते, तसेच 116.64 ग्रॅम म्हणजेच 10 तोळे सोने दिले होते. मात्र, त्यानंतरही चारचाकी खरेदी करण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा आरोप
मृत महिलेचे नाव वैष्णवी ओंकार गिसरे असे आहे. त्या पुण्यातील वडाचीवाडी परिसरातील एका निवासी सोसायटीमध्ये पतीसोबत राहत होत्या. वैष्णवी यांचा विवाह ओंकार संजय गिसरे (वय 28) यांच्यासोबत 9 मे रोजी झाला होता. विवाहासाठी वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी सुमारे 45 लाख रुपये खर्च केले होते. तसेच लग्नात 10 तोळे सोने भेट म्हणून दिले होते. मात्र, लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
