महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण, मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

मुंबई तक

Maharashtra cabinet decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Maharashtra cabinet decision
Maharashtra cabinet decision
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय आरक्षण

point

मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

Maharashtra cabinet decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 10 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. ही बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये अग्निवीरांना  शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय इतर काही निर्णय देखील घेण्यात आलेत.  याबाबत सविस्तर जाणून घेऊयात... 

1.महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण. गट – क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर नियुक्ती मिळणार. सैन्य दलातून चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या अग्निविरांना सेवेत दाखल करून घेण्याचे धोरण निश्चित. (सामान्य प्रशासन विभाग)

2. महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर. राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिके, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्त्रोत यांचा साकल्याने विचार. विविध शासकीय वैरण विकास योजनांचे नियोजन. दुग्धव्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायास चालना मिळणार. (पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग)

3. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा 2 हजार 761 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर. (गृह विभाग)