NCPची युवती, फार्महाऊसवर शारीरिक संबंध आणि झेडपीच्या सभेत गोंधळ
pune crime : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या तक्रारीतून धक्कादायक आरोप समोर आले आहेत. लग्नाचे आमिष, शारीरिक संबंध आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
NCPची युवती, फार्महाऊसवर शारीरिक संबंध आणि झेडपीच्या समेत गोंधळ
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या तक्रारीतून धक्कादायक आरोप
Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर दाखल झालेल्या एफआयआरमधून धक्कादायक आरोप समोर आले आहेत. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीची पदाधिकारी असून तिची 2007 मध्ये पुण्यात शिक्षण घेत असताना जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि लग्नाचे आश्वासनही देण्यात आले, असा दावा तिने केला आहे. मात्र 2012 मध्ये कोणतीही पूर्वकल्पना न देता मंगेश जगताप यांनी दुसऱ्या महिलेसोबत विवाह केल्याने तिने त्यांच्याशी संबंध तोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : नागपूर : 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून बलात्कार, 19 वर्षीय नराधमाला अटक; लॉकअपमध्ये पिझ्झाची मागणी
फार्महाऊसवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध
महिलेच्या म्हणण्यानुसार, विवाहानंतरही मंगेश जगताप यांनी तिच्याशी पुन्हा संपर्क साधला. आईला कर्करोग झाल्याचे सांगून त्यांनी संवाद सुरू केला आणि नंतर पत्नीसोबत राहत नसल्याचा तसेच लवकरच घटस्फोट घेणार असल्याचा दावा केला. त्यानंतर घटस्फोटाशी संबंधित असल्याचे सांगितलेली काही कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र आणि इतर दस्तावेज दाखवून तिचा विश्वास संपादन करण्यात आला. त्याचबरोबर पत्नी आणि काही मित्रांमार्फतही घटस्फोट होणार असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. या विश्वासाच्या आधारे फार्महाऊसवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले, असा आरोप तिने एफआयआरमध्ये केला आहे.
हेही वाचा : वेदर रिपोर्ट : अरबी समुद्रात नैऋत्य वारे अॅक्टिव्ह, महाराष्ट्रावर धडकणार; कुठे कुठे अलर्ट?
