पुणे : एअरफोर्स जवान म्हणून थाटात फिरायचा, टेलरच्या दुकानी गेला पुरता फसला
pune fake air force jawan : पुण्यात स्वतःला भारतीय वायुसेनेचा जवान सांगणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. एअरफोर्सची वर्दी शिवण्यासाठी गेलेल्या टेलरच्या संशयामुळे त्याचा बनाव उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : एअरफोर्स जवान म्हणून थाटात फिरायचा
टेलरच्या दुकानी गेला पुरता फसला
pune fake air force jawan : पुण्यात पोलिसांनी भारतीय वायुसेनेचा बनावट जवान असल्याचे भासवणाऱ्या शुभम विलास अंबुरे (26) याला अटक केली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला शुभम पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात सलूनमध्ये काम करतो. मात्र, आपल्या गावात तो आपण भारतीय वायुसेनेत जवान असून तेथे नोकरी करत असल्याचे कथितपणे सांगत होता. स्वतःची ओळख आणि गावातील 'वजन' वाढवण्यासाठी त्याने ही बनावट ओळख तयार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
हेही वाचा : हा ग्राऊंड रिपोर्ट डोळे उघडून बघायलाच हवा, इन्फ्रामॅन कुठे आहेत?
टेलरला विसंगती असल्याचा संशय अन् सगळं उघडकीस
शुभमचा हा बनाव पुण्यातील लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीमधील बालाजी टेलर्समध्ये उघडकीस आला. एअरफोर्सची वर्दी शिवून घेण्यासाठी तो टेलरकडे पोहोचला होता. आपण वायुसेनेत तैनात असल्याचे सांगत त्याने युनिफॉर्म शिवून देण्यास सांगितले. टेलरने त्याच्याकडे काही अधिक माहिती मागितली आणि ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. त्यानंतर शुभमने खिशातून एक ID कार्ड काढून टेलरला दाखवले. मात्र, कार्ड पाहिल्यानंतर टेलरला त्यामध्ये काहीतरी विसंगती असल्याचा संशय आला. यापूर्वीही एअरफोर्सच्या जवानांची वर्दी शिवताना टेलरने त्यांची ओळखपत्रे पाहिली होती. त्यामुळे त्याला शुभमच्या ओळखपत्राबाबत संशय आला आणि त्याने तातडीने लोहगाव पोलिसांना याची माहिती दिली.
हेही वाचा : 'चल, तुला क्लासपर्यंत सोडतो...' विद्यार्थीनीवर वाटेतच बलात्कार; तरुणाला अटक
