Pune Accident CCTV : तरुणीला सुसाट कारने उडवले, दृश्य बघून पुणेकर हादरले

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : Pune Accident Viral video : पुण्यात नुकतेच घडलेले पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असताना, आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या घटनेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भुजबळ चौकात काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला, ज्याचा CCTV फुटेज आता व्हायरल होत आहे. (pune pimpri chinchwad accident a car hit an engineer women now cctv footage going viral on social media)

ADVERTISEMENT

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. भरधाव वेगात आलेल्या कारने इंजिनिअर तरूणीला मागून धडक दिल्याने तरुणी काही फूट अंतरावर जाऊन आदळली. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी सांगितले की, चालकाविरोधात तरूणीने कोणतीही तक्रार दाखल न केल्याने त्याला सोडण्यात आलं. 

हेही वाचा: Rahul Gandhi : "....तर पंतप्रधान मोदी 2 ते 3 लाख मतांनी हरले असते"

कार चालकही इंजिनीअर असल्याचे सांगण्यात येत आहे. 23 मे 2024 चा हा सीसीटीव्ही आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनीअर तरुणी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भुजबळ चौकात रस्त्याच्या कडेला उभी होती. तेवढ्यात एक भरधाव कार तिच्या दिशेने आली आणि मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात मुलगी किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा: Dombivli : डोंबिवलीत पुन्हा एका कंपनीत अग्नितांडव! शाळेजवळ असलेल्या कारखान्याला आग

 

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चालकाला पोलीस ठाण्यात आणले. परंतु, मुलीने तक्रार न केल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर हिंजवडी पोलिसांनी तरुणी व तिच्या काकांशी अनेकवेळा फोनवरून संपर्क साधून तक्रारीची माहिती घेतली. मात्र, तक्रार देण्यास त्यांनी नकार दिला. 

ADVERTISEMENT

हेही वाचा: Baramati : सुनेत्रा पवार खासदार होणार? राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

सध्या 23 मे 2024 च्या 'त्या' अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या अपघाताची चर्चा होत आहे. पोलिसांवर आरोप होत आहेत. पोलिसांनी स्वत: तक्रार का घेतली नाही? अशी विचारणाही करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT