Pune Accident: मुलाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या शिवानी अग्रवालला अटक!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shivani Agarwal Arrested : पुणे पोर्श कार अपघात (pune porsche car accident) प्रकरणी गुन्हे शाखेने आता अल्पवयीन आरोपीच्या आईलाही (Shivani agarwal) अटक केली आहे. आज (1 जून) तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुलाच्या रक्तात दारू सापडू नये म्हणून शिवानी अग्रवालने अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलसोबत स्वत:चे ब्लड सॅम्पल बदलले होते. ही धक्कादायक माहिती समोर येताच शिवानी फरार झाली होती. अखेर पुणे पोलिसांनी तिचा शोध लावला आहे. काल (31 मे) रात्री ती मुंबईहून पुण्यात आली. सध्या ती पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. (pune porsche accident shivani agarwal arrested for changing blood sample to save accussed son)

या प्रकरणी ससून रूग्णालयाचे दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉय आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. ब्लड सॅम्पलसोबत हेराफेरी केल्यामुळे आरोपीच्या वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'महाराष्ट्र BJP चा सगळा खेळ बिघडवेल', कोणी सांगितला नेमका आकडा?

 

ब्लड सॅम्पलमध्ये झालेली हेराफेरी कशी झाली उघड?

ब्लड सॅम्पलमध्ये हेराफेरी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. ज्यावेळी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली तेव्हा ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. तावरे यांनी माझ्यावर दबाव टाकला. ते ब्लड सॅम्पल मुलाच्या आईच्या रक्तासोबत बदलण्यात आल्याचंही आरोपी डॉ. हळनोरने सांगितलं. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांना अटक करण्यात आली. तर शिवानी अग्रवाल या दोघांच्या अटकेनंतर फरार होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा: Exit Poll 2024: 2019 च्या लोकसभेचे एक्झिट पोल किती ठरले होते खरे?

 

आमदारांच्या शिफारशीवरून डॉक्टरांची नियुक्ती

आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनंतर अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉ.तावरेची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी केला आहे. शिफारशीनंतरच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या नियुक्तीला मान्यता दिली. विनायक काळे म्हणाले, 'किडनी प्रत्यारोपण आणि औषध प्रकरणातील आरोपी असतानाही डॉ. तावरे यांची फॉरेन्सिक मेडिकल विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.'

अल्पवयीन मुलाचे वडील आणि डॉक्टर यांच्यात 14 कॉल

पोलीस सूत्रांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी, विशाल अग्रवालचे डॉ. तावरे सोबत व्हॉट्सॲप आणि फेसटाइम कॉल तसेच नॉर्मल कॉलद्वारे बोलणे झाले होते. दोघांमध्ये एकूण 14 कॉल्स झाले. हे कॉल 19 मे रोजी सकाळी 8.30 ते 10.40 च्या दरम्यान करण्यात आले होते. यानंतर सकाळी 11 वाजता अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले.

ADVERTISEMENT

हेही वाचा: Exit Poll 2024: 2019 च्या लोकसभेचे एक्झिट पोल किती ठरले होते खरे?

 

खरं तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) अहवालात पहिल्या ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोल आढळून आले नाही. शंका आल्यावर पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्यात आली. येथील डीएनए चाचणीत रक्ताचे नमुने दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे असल्याचे समोर आले. दुसऱ्या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोपीला वाचवण्यासाठी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा संशय पोलिसांना आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT