Exit Poll 2024: 2019 च्या लोकसभेचे एक्झिट पोल किती ठरले होते खरे?
Maharashtra Exit Poll 2024 : एक्झिट पोलवरून देशात नेमकी कुणाची सत्ता येणार याचा एक अंदाज कळणार आहे. त्यामुळे हे आकडे नेमक्या कुणाचे बाजूने असणार आहेत भाजपच्या (NDA) की इंडिया आघाडीच्या (India Alliance)? याची उत्सुकता संपूर्ण देशवासियांना लागले आहेच.
ADVERTISEMENT
Maharashtra Exit Poll 2024 : देशात सातव्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. या मतदानानंतर सायंकाळी उशीरा एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) आकडे येणार आहेत. या एक्झिट पोलवरून देशात नेमकी कुणाची सत्ता येणार याचा एक अंदाज कळणार आहे. त्यामुळे हे आकडे नेमक्या कुणाचे बाजूने असणार आहेत भाजपच्या (NDA) की इंडिया आघाडीच्या (India Alliance)? याची उत्सुकता संपूर्ण देशवासियांना लागले आहेच. तत्पुर्वी आपण पाहुयात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) जो एक्झिट पोल समोर आला होता, त्या एक्झिट पोलच्या आकड्यात आणि निकालात किती फरक होता. (maharashtra exit poll 2024 mahayuti vs maha vikas aghadi how accurae exit poll in 2019 lok sabha election)
ADVERTISEMENT
आज तक अॅक्सिस माय इंडियाच्या (Aaj Tak Axix My india) एक्झिट पोलनुसार (भाजप-शिवसेना) एनडीएला 38 ते 42 जागा तर (काँग्रेस-राष्ट्रवादी) युपीएला 6 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज होता. इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या (India TV CNX) एक्झिट पोलनूसार, एनडीएला 34 जागा आणि युपीएला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. टाइम्स नाऊ वीएमआरच्या (Times NOW VMR) एक्झिट पोलनुसार एनडीएला 38 जागा तर युपीएला 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच एबीपी सी व्होटर (ABP C-Voter Survey) सर्वेंनुसार एक्झिट पोलमध्ये एनडीएला 34 जागा, युपीएला 14 जागा मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला होता.
हे ही वाचा : Bjpला किती जागा मिळणार? राजदीप सरदेसाईंनी वर्तवले भाकित
2019 चा एक्झिट पोल | एनडीए | युपीए |
आज तक अॅक्सिस माय इंडिया | 38-42 | 6-10 |
इंडिया टीव्ही सीएनएक्स | 34 | 14 |
टाइम्स नाऊ वीएमआर | 38 | 10 |
एबीपी सी व्होटर सर्वे | 34 | 14 |
र सर्वे 34 14
हे वाचलं का?
लोकसभेचा निकाल काय लागला?
महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालात भाजप आणि शिवसेनेच्या युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळवून अवघ्या 6 जागा जिंकता आल्या होत्या.
कुणाचा एक्झिट पोल खरा ठरला?
आज तक अॅक्सिस माय इंडियाने जो एक्झिट पोल दिला होता, तो तंतोतंत खरा ठरला होता. आज तक अॅक्सिस माय इंडियाने एनडीएला 38-42 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.त्यानुसार एनडीएला 41 जागा आल्या होत्या. तर युपीएला 6-10 जागा मिळण्याचा अंदाज बांधला होता त्यानुसार युपीएला 6 जागा आल्या होत्या. त्यामुळे आज तक अॅक्सिस माय इंडियाने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा दिलेला एक्झिट पोल अचूत ठरला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "स्मृती इराणी पराभूत होऊ शकतात", कोणता 'फॅक्टर' गेमचेंजर?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT