Lok Sabha Election 2024: 'महाराष्ट्र BJP चा सगळा खेळ बिघडवेल', कोणी सांगितला नेमका आकडा?
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रासोबत चार राज्य ही भाजपचा सगळा खेळ बिघडवेल असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आशुतोष यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 1 जून रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. उद्या संध्याकाळी 6 नंतर एक्झिट पोलचे आकडेही समोर येतील. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी सर्वांच्या नजरा लागल्या आहेत की, यावेळी देशात सरकार कोण बनवणार, NDA की INDIA? हे जाणून घेण्यासाठी न्यूज तकने ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आशुतोष यांच्याशी खास बातचीत केली. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रासोबत इतर तीन राज्यातील असे अंदाज वर्तवले आहेत की, ज्यामुळे भाजपची चिंता वाढू शकते. (lok sabha election 2024 maharashtra will spoil bjp entire game senior journalist and political analyst ashutosh has predicted exact number)
ADVERTISEMENT
'ही' चार राज्यं बिघडवतील भाजपचा खेळ
महाराष्ट्रात एनडीएचे मोठे नुकसान होणार आहे
महाराष्ट्र हे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. पण या राज्यातील मतदार हे भाजपचा खेळ बिघडवू शकतात असा अंदाज आशुतोष यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फोडून भाजपने राज्यातील संपूर्ण राजकारणामध्ये गोंधळ निर्माण केला. राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत वाईट आहे. यावेळी भाजप महाराष्ट्रात 28 जागांवर निवडणूक लढवत आहे. राज्यात भाजपला 7 ते 8 जागांवर फटका बसू शकतो. जर निवडणुकीत थोडं तरी वातावरण बदललं असेल तर महाराष्ट्रात भाजप-एनडीएचे मोठे नुकसान होऊ शकते.'
कर्नाटकात भाजपला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करता येणार नाही
याशिवाय आशुतोष असंही म्हणाले की, 'या निवडणुकीत चार स्विंग स्टेट आहेत जे भाजपचे काम बिघडू शकतात. ही चार राज्ये म्हणजे बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक. गेल्या निवडणुकीत भाजपने या चार राज्यात चांगली कामगिरी केली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करणे अवघड दिसत आहे.'
हे ही वाचा>> LIVE Streaming: मुंबई Tak सोबत कसा पाहू शकाल Exit Poll?
आशुतोष यांनी सांगितले की, 'कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा आहेत. गेल्या वेळी भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप 22 जागांवर निवडणूक लढवत आहे. भाजपचा मित्रपक्ष जनता दल सेक्युलर (जेडीएस) 3 जागांवर निवडणूक लढवत आहे. कर्नाटकात भाजपच्या जागा खूपच कमी असतील', असा आशुतोष यांचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
आशुतोष म्हणाले की, गेल्या दोन-तीन महिन्यांत निवडणुकीने आपला कल बदलला आहे. जानेवारीमध्ये लोकसभा निवडणुका एकतर्फी होतील असं चित्र होतं. मात्र निवडणुका जवळ येताच भाजपमध्ये जोरदार टक्कर देण्यात आली. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, पण केंद्रात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही, असा आशुतोष यांचा अंदाज आहे.
हे ही वाचा>> Bjpला किती जागा मिळणार? राजदीप सरदेसाईंनी वर्तवले भाकित
ते म्हणाले की, भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत सहज सरकार स्थापन करेल. पंतप्रधान कोण होऊ शकतो? यावर उत्तर देताना आशुतोष म्हणतात की फक्त नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. ते पुढे म्हणाले की, सरकार सतत दहा वर्षे सत्तेत असल्याने देशात सत्ताविरोधी लाट दिसून येत असून, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांमुळे सत्ताधारी भाजपला निवडणुकीमध्ये कडवी झुंज द्यावी लागली आहे.
ADVERTISEMENT
मात्र, आशुतोष असंही म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते चांगलेच उत्साहित झाले होते, ही निवडणूक एकतर्फी होईल आणि आपण ती सहज जिंकू असं त्यांना वाटलेलं. अतिआत्मविश्वासामुळे त्यांनी प्लॅन-बी बनवलाच नाही. याचे परिणाम त्यांना जागा गमावून भोगावा लागेल.'
ADVERTISEMENT
आशुतोष म्हणाले की, 'भाजपची मतांची टक्केवारी पाहिली तर ती अत्यंत असुरक्षित आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 31 टक्के मते मिळाली होती. तर 2019 मध्ये भाजपला 37 टक्के मते मिळाली होती. 37 टक्के हा आकडा अत्यंत असुरक्षित आहे. 2 ते 3 टक्के मते जरी कमी पडली तर त्याचा जागांवर मोठा परिणाम होईल. आकडा दिसताना मोठा दिसतो पण तो अतिशय गंभीर ठरू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT