सायन्सच्या शिक्षिकेला लॅबमध्ये बोलावले अन् घडलं भयंकर, गणिताचा शिक्षक का झाला फरार?

मुंबई तक

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, जून 203 पासून ती या शाळेत कार्यरत आहे. शाळेतील सायन्स लॅबच्या कपाटांच्या दुरुस्तीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये पीडिता आणि आरोपी शिक्षकाचा समावेश होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

सायन्सच्या शिक्षिकेला लॅबमध्ये बोलावले अन् घडलं भयंकर

point

गणिताचा शिक्षक का झाला फरार?

Crime News : एका सरकारी सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या महिला विज्ञान शिक्षिकेचा विनयभंग आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी एका गणित शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, जून 203 पासून ती या शाळेत कार्यरत आहे. शाळेतील सायन्स लॅबच्या कपाटांच्या दुरुस्तीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये पीडिता आणि आरोपी शिक्षक प्रवीण कुमार या दोघांचा समावेश होता. पंजाबमधील बठिंडा येथील ही घटना आहे. 

लॅबमध्ये बोलावून विनयभंग

घटनेच्या दिवशी पीडितेने वरिष्ठ या नात्याने आरोपी प्रवीन कुमारला कपाटांमधील त्रुटींबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोपीने तिला लॅबमध्ये येऊन प्रत्यक्ष दाखवण्यास सांगितले. पीडिता लॅबमध्ये पोहोचली असता, आरोपीने प्रथम तिच्यावर अश्लील टिप्पणी केली आणि त्यानंतर तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पीडितेने या कृत्याचा प्रतिकार केला, तेव्हा आरोपीने बळजबरीने तिचा हात धरून तिचा विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकारामुळे महिला शिक्षिका पूर्णपणे हादरून गेली होती.

हे ही वाचा : तरुणीसोबत वृद्ध नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, काँग्रेस-भाजपमध्ये चांगलीच जुंपली

शिक्षकाने दिली धमकी

पीडितेने आरोप केला आहे की, गैरवर्तन केल्यानंतर आरोपीने तिला धमकावले की, जर तिने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील. मात्र, आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर तिने हिंमत एकवटली आणि शाळेतील इतर महिला कर्मचारी तसेच आपल्या कुटुंबाला या घटनेची सविस्तर माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेचे पती आणि सासरे तत्काळ शाळेत पोहोचले आणि त्यानंतर पीडितेने कुटुंबासह पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.

हे ही वाचा : इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेली सोन्यासारखी मुलगी जीवानिशी गेली, अनुपमासोबत बॉयफ्रेंडने काय केलं?

प्रवीण कुमार फरार

पोलीस ठाण्याने पीडितेच्या जबाबावरून आरोपी शिक्षक प्रवीण कुमार याच्याविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून आरोपी सध्या फरार असल्याचे समजते. पोलीस पथके ठिकठिकाणी छापेमारी करत असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात संताप व्यक्त केला जात असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

हे वाचलं का?