Crime : सासऱ्याने कोर्टातच IRS जावयाला घातल्या गोळ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

punjab cop shoot irs officer son in law dead in chandigarh district court former aig arrested chandigarh
आयआरएस अधिकाऱ्यावर गोळीबार (Irs Officer) झाल्याची घटना घडली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोर्टातच आयआरएस अधिकाऱ्यावर गोळीबार

point

माजी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने झाडली गोळी

point

गोळीबारात आयआरएस अधिकाऱ्याचा मृत्यू

Crime News : कोर्ट म्हटलं की न्याय आलाच, इथे प्रत्येकालाच न्याय मिळतो. मात्र या घटनेत थेट कोर्ट (Court) परिसरात अन्याय झाल्याची घटना घडली आहे. त्याचं झालं असं की एका सुनावणीसाठी आलेल्या आयआरएस अधिकाऱ्यावर गोळीबार (Irs Officer) झाल्याची घटना घडली आहे. हरप्रीत सिंह असे या गोळीबारात मृत पावलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेने कोर्ट परिसरात खळबळ उडाली आहे.  (punjab cop shoot irs officer son in law dead in chandigarh district court former aig arrested chandigarh)

ADVERTISEMENT

पंजाबच्या चंदिगडमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत कोटुंबिक न्यायालयाच्या खटल्याप्रकरणी दोन कुटुंब एकत्र आली होती. मृत अधिकारी हरप्रीत सिंह आणि आरोपीची मुलगी यांच्यात घटस्फोट होणार होता. यासाठी त्यांना सुनावणीसाठी कौटुंबिक न्यायालयात बोलावले होते. 

खरं तर या दोघांमध्ये 2023 पासून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. पण दोघांमध्ये मध्यस्थी व्हावे यासाठी चौथी बैठक बोलावली होती. यावेळी हरप्रीत सिंह त्यांच्या आई वडिलांसह कोटुंबिक कोर्टात दाखल झाले होते. दुसऱ्या बाजूला मुलीचे वडील पंजाब पोलिसांचे निवृत्त सहायक महानिरीक्षक (एआयजी) सासरे, सेवानिवृत्त अधिकारी मलविंदर सिंह हे देखील उपस्थित होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai Weather : मुंबईकरांना पाऊस धरणार वेठीस! IMD कडून तुफान पावसाचा इशारा

कोटुंबिक न्यायालयाच्या आवारात असतानाच सासरे मलविंदर सिंह यांनी जावई हरप्रीत सिंह यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर आई वडिलांनी कोर्ट परिसरात आक्रोश केला होता. यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेने एकच खळबळ माजली होती. 

हरप्रीत सिंह आणि मलविंदर सिंह यांच्यात 2023 पासून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. आज दोन्ही कुटुंबियांमध्ये मध्यस्थी केंद्रात चौथी बैठक होती. या दरम्यान पंजाब पोलिसांचे निवृत्त सहायक महानिरीक्षक (एआयजी) सासरे यांनी चंदीगड न्यायालयाच्या आवारात आयआरएस अधिकारी हरप्रीत सिंह यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

ADVERTISEMENT

हरप्रीत सिंह यांच्यावर कौटुंबिक वादाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी चंदिगड जिल्हा न्यायालयात असताना सेवानिवृत्त अधिकारी मलविंदर सिंह यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मालविंदर सिंहने मध्यस्थी केंद्राजवळ हरप्रीत सिंहवर गोळीबार केला. या घटनेनंतर अधिकाऱ्याला पीजीआयमध्ये नेण्यात आले जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते, असे चंदिगड पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki bahin Yojana : 19 ऑगस्टला मिळणार पैसै, तुमचा अर्ज कुठंपर्यंत पोहोचला; कसे बघणार?

दरम्यान आरोपी मलविंदर सिंह यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक शस्त्र जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी एक पिस्तूल, चार गोळ्या आणि तीन न वापरलेल्या गोळ्या जप्त केल्या आहेत. मलविंदर सिंगवर हत्या आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT