Satara Pusesasavali : आक्षेपार्ह पोस्टवरुन पुसेसावळीत जाळपोळ, एकाचा मृत्यू, 25 जणांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Satara Pusesawali social media offensive message
Satara Pusesawali social media offensive message
social share
google news

Satara Pusesasavali : सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (Offensive post) टाकल्यानंतर रविवारी (दि.10) रात्री उशिरा जाळपोळीची घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 13 ते 14 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातारा पोलिसांनी 25 जणांना अटक केली आहे . तर अन्य सहभागी असणाऱ्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील वातावरण तंग होते. त्यानंतर पोलिस सुरक्षा वाढवल्याने पुसेसावळीला पोलिसी छावणीचे रुप प्राप्त झाले होते.

ADVERTISEMENT

 परिस्थिती तणाव पूर्ण

ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा मृतेदह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला आहे. याबाबत जिल्हा सातारा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचा जमावजोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन केले. या सर्व प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात तणाव पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा >>Maratha Reservation : ‘टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका’, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…

आक्षेपार्ह पोस्ट

या प्रकरणी भाजपाचे कराडचे वरिष्ट नेते व हिंदू जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख विक्रम पावस्कर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. याबाबत अशी माहिती देण्यात आली की, काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे काही युवकांनी समाज माध्यमांवर देव देवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्या होत्या. प्रकरणी पुसेसावळीत अंतर्गत धुसपूस सुरू होती. त्यातच रविवारी दोन युवकांनी इंस्टाग्राम सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळून आले. त्यामुळे पुसेसावळी व परिसरातील युवकांनी आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या युवकांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या व्यवसायाच्या गाड्या रस्त्यावर पाडून मोडतोड केल्या. तसेच त्या रात्री उशिरा जाळपोळही करण्यात आली.

हे वाचलं का?

ग्रामस्थ भयभीत

या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला, स्थानिक पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रण आणली होती; परंतु परिसरातून मोठ्या प्रमाणावर युवक जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. साताऱ्यातून तातडीने पोलीस कुमक आल्याने जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शांततेचे आवाहन करत आहेत. या घटनेने पुसेसावळीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या घटनेदरम्यान 13 ते 14 जण जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक होती. त्याचा आज मृत्यू झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती वाढली आहे.

दोषींना अटकेची मागणी

सातारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यातून मुस्लिम समाज जमा झाला आहे. तर त्या ठिकाणी जोरदार मागणी करत या घटनेच्या पाठीमागे जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Raju Patil : मनसे आमदाराने भाजपची उडवली खिल्ली; पाटील म्हणाले, ‘एक पीआय…’

शांतता राखण्याचे आवाहन

या घटनेनंतर अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख विजयकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळावर येऊन नागरिकांना शांत करत 25 आरोपींना याप्रकरणी अटक केली. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यामध्ये या पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमावाला शांततेचे आवाहन केले आहे. यावर मुस्लिम समाजाच्यावतीने मुस्लिम समाजाचे प्रमुख सादिक भाई शेख यांच्यासह मुस्लिम जमात अमीर यांनी देखील मुस्लिम समाजाच्या नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT