क्रुरतेची हद्द! जमिनीचा वाद, ट्रॅक्टरखाली 8 वेळा चिरडले, वाचवण्याऐवजी लोकं व्हिडीओ करण्यात दंग
जमिनीचा वाद किती विकोपाला जातो हे राजस्थानमधील एका घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण जमिनीसाठी एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली एकदा नाही, दोनदा नाही तर सलग 8 वेळा चिरडले आहेत. तर शेजारी असलेली लोकं त्याला वाचवण्याऐवजी मात्र त्या घटनेचा व्हिडीओ करण्यात मग्न होती.
ADVERTISEMENT
Rajasthan Crime: राजस्थानमधील भरतपूरमध्ये जमिनीच्या वादावरुन दोन गटात जोरदार हाणामारी होऊन एका व्यक्तीचा त्यामध्ये मृत्यू (Murder) झाला आहे. जमिनीच्या वाद सुरू झाल्यानंतर क्रुरतेने एका व्यक्तीला ट्रॅक्टर घालून 7 ते 8 वेळा चिरडण्यात आले आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
ट्रॅक्टर घालून व्यक्तीला चिरडत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालकाने तरीही ट्रॅक्टर चालवून त्या व्यक्तीला चिरडण्यात आले आहे.(rajasthan crime man was crushed death under tractor 8 times due to land dispute)
ADVERTISEMENT
जमिनीचा वाद विकोपाला
भरतपूरमध्ये हा वाद चालू झाल्यानंतर आणि ट्रॅक्टरखाली त्या व्यक्तीला चिरडले जात असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या घरातील करत होते. तर जवळ असलेल्या नागरिकांनी मात्र त्याला वाचवण्यापेक्षा त्या घटनेचा व्हिडीओ करण्यात दंग होते.
हा जमिनीचा वाद गेल्या काही दिवसांपासून बहादूरसिंग गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर कुटुंबीयांमध्ये सुरुच होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली घातले तर इतर 12 जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बयाना पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे ही वाचा >>भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’
ट्रॅक्टर थांबवणाऱ्यालाच चिरडले
या प्रकरणी दोन्ही गटातील 22 जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. मात्र बुधवारी बहादूसिंग गुर्जर बाजूचे लोक ट्रॅक्टर घेऊन वादग्रस्त जमीन नांगरण्यासाठी गेले होते. त्यानंतर अतारसिंग गुर्जर कुटुंबीयांनी त्याला विरोध करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्यांनी नांगरणी करण्यासाठी त्यांनी विरोध करताच दोन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी सुरु झाली. हा वाद सुरु असताना 45 वर्षाचे निर्पथसिंग गुर्जर ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र चालकाने थेट त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्यात आले.
हे वाचलं का?
लोकं व्हिडीओत मग्न
या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली गेली असली तरीही ट्रॅक्टरखाली त्या माणसाला चिरडले जात असताना अनेक जण या घटनेचा व्हिडीओ करण्यात मग्न होते, मात्र त्या व्यक्तीला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला गेला नाही.
हे ही वाचा >> Crime : चार मुलांसमोरच बायकोचा दाबला गळा, मरेपर्यंत सोडलंच नाही; कारण…
कोणालाही चिरडलं असतं
निपथसिंग गुर्जर यांना ट्रॅक्टरने चिरडत असताना ट्रॅक्टर चालक इतक्या वेगाने तो त्यांना चिरडत होता की, आणखी कोणीही त्याच्या आडवं आलं असतं तरी तो त्याला चिरडून टाकला असता इतक्या वाईट पद्धतीने तो निपथसिंगना तो चिरडत होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT