सख्ख्या बहिणींवर चार वर्षांपासून सामूहिक बलात्कार, पोलिसांनी ऐकून घेतली नाही तक्रार, अखेर...

मुंबई तक

मार्च महिन्यात अनेक वर्षांच्या सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली होती. या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच, तिच्या लहान बहिणीनेही पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यामुळे विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

सख्ख्या बहिणींवर चार वर्षांपासून सामूहिक बलात्कार

point

पोलिसांनी ऐकून घेतली नाही तक्रार

point

अखेर...

Crime News : राजस्थानमधील जोधपूरच्या ग्रामीण भागात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मार्च महिन्यात अनेक वर्षांच्या सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली होती. या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच, तिच्या लहान बहिणीनेही पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यामुळे विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे. एकाच घरातील दोन तरुण बहिणींच्या अशा करुण अंतामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांच्या ढिसाळ आणि संशयास्पद कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आपल्या मुली गमावलेल्या हताश वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची आणि नराधमांना कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

अश्वील व्हिडिओंच्या जोरावर..

या भयानक प्रकरणाची सुरुवात ई-मित्र सेवा केंद्र चालवणाऱ्या महिपाल नावाच्या स्थानिक नराधमापासून झाली. महिपालने मोठ्या बहिणीचे काही अश्लील व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केले होते. या व्हिडिओंच्या जोरावर तो आणि त्याचे साथीदार शिवराज, गोपाळ, विजाराम, दिनेश, मनोज आणि पुखराज हे गेल्या चार वर्षांपासून त्या तरुणीवर सातत्याने सामूहिक बलात्कार करत होते आणि तिला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होते. या असह्य छळाला कंटाळून अखेर 20 मार्च रोजी मोठ्या बहिणीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर लहान बहिणीने अत्यंत धैर्याने पुढे येत 11 एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आठ जणांविरुद्ध गुन्हा (FIR) नोंदवला. तिने पोलिसांना स्पष्ट इशारा दिला होता की, जर तिला न्याय मिळाला नाही, तर तीही आपले आयुष्य संपवेल.

हे ही वाचा : NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, मांढरे मॅडम अडकल्या, असं कांड केलं की चक्रावून जाल!

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढले धाडस

परंतु, एफआयआर दाखल होऊन महिना उलटला तरी पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पोलिसांच्या या ढिसाळपणामुळे आरोपींचे धाडस आणखी वाढले. मोठ्या बहिणीच्या मृत्यूनंतर या नराधमांनी लहान बहिणीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मोठ्या बहिणीचे  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावरही लैंगिक अत्याचार केले. "पोलीस आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत," अशी उघड धमकी देत ते पीडितेला सतत त्रास देत होते. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी या हताश तरुणीने शुक्रवारी एका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले, व तिथेच विष प्राशन केले. रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे ही वाचा : आधी झाडाला बांधून मारले अन् नंतर प्रायव्हेट पार्ट्सचा घेतला चावा; 17 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?

नागरिकांची निदर्शने

या दुहेरी आत्महत्येच्या सत्रामुळे प्रचंड रोष निर्माण झाला असून, शवविच्छेदन गृहाबाहेर नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी करत तीव्र निदर्शने केली. मारवाड राजपूत सोसायटीचे अध्यक्ष हनुमान सिंह खंगता यांनी पोलिसांवर थेट आरोप केला आहे की, पोलीस प्रशासन सुरुवातीपासूनच आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत होते आणि त्यांच्या याच निष्काळजीपणामुळे आज दोन निष्पाप बहिणींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या वाढत्या जनक्षोभानंतर जोधपूर पोलीस अधीक्षक (SP) पी. डी. नित्या यांनी सांगितले की, मुख्य आरोपी महिपालसह आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ विभागीय चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
 

हे वाचलं का?