बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध, पण घरच्यांनी दुसरीकडेच ठरवलं लग्न! अखेर, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय अन्...

मुंबई तक

कुटुंबियांनी प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे एका जोडप्याने भयंकर कृत्य केल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

अखेर, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय अन्...
अखेर, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध, पण घरच्यांनी दुसरीकडेच ठरवलं लग्न!

point

अखेर, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय अन्...

Crime News: प्रेमसंबंधातून बऱ्याच धक्कदायक घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अशीच एक बातमी समोर आली आहे. त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यात कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे एका जोडप्याने भयंकर कृत्य केल्याची माहिती आहे. 26 वर्षीय सोहेल मियां नावाचा तरुण आणि उदयपूरच्या शिलगती येथील रहिवासी असलेल्या जन्नत अख्तर नावाची तरुणी यांचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. परंतु त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे दुसरीकडेच लग्न ठरवलं होतं. कुटुंबियांनी नात्याला विरोध केल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. नेमकं काय ठरलं? 

तरुणीचा कारमध्ये मृतदेह अन्... 

बुधवारी सायंकाळी 4:30 च्या सुमारास, आरके पुरम पोलीस स्टेशन परिसरातील होलसेत परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उदयपूरच्या एसडीपीओ देबांजली रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. जन्नतचा मृतदेह एका कारमध्ये पडला होता आणि तिच्या शरीरावर गोळ्या झाडल्याच्या जखमा होत्या. गोळीबारामुळे जन्नतचा जागीच मृत्यू झाला होता. तिच्यापासून थोड्या अंतरावर, तिचा प्रियकर सोहेल जखमी अवस्थेत होता. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत आवडीचा फ्लॅट खरेदी करण्याची संधी! 4,508 घरांसाठी सिडकोची लॉटरी, सरकारकडून सब्सिडीसुद्धा...

वाटतेच प्रियकराचा मृत्यू 

पोलिसांनी प्रियकर सोहेलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु गंभीररित्या जखमी असल्यामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झाला. गाडी पार्क केलेल्या ठिकाणापासून सुमारे 20 मीटर अंतरावर पोलिसांना एक पिस्तूल देखील आढळून आली. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात, सोहेलने आधी जन्नतवर गोळी झाडली आणि त्याच पिस्तूलने स्वत:वर सुद्धा गोळी चालवल्याचं स्पष्ट झालं. 

हे ही वाचा: मामा-मामीने केवळ 90 हजार रुपयांसाठी पाच वर्षांच्या भाचीला विकलं अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

पोलिसांचा तपास 

मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप खरी माहिती समोर आलेली नसून पोलीस सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेचा तपास सुरुवातीच्या टप्प्यात असून यामध्ये कोणा दुसऱ्या व्यक्तीचा देखील समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या, या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp