मामा-मामीने केवळ 90 हजार रुपयांसाठी पाच वर्षांच्या भाचीला विकलं अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई तक

मामा आणि मामीने मिळून आपल्या पाच वर्षांच्या भाचीचं अपहरण केलं आणि तिला 90,000 रुपयांसाठी विकल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

90 हजारांसाठी पाच वर्षांच्या भाचीला विकलं अन्...
90 हजारांसाठी पाच वर्षांच्या भाचीला विकलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

केवळ 90,000 रुपयांसाठी पाच वर्षांच्या भाचीला विकलं

point

मामा-मामीचं भाचीसोबत संतापजनक कृत्य

point

मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime: मुंबईतून नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सांताक्रूझच्या पूर्वेकडील वाकोला परिसरात एका 5 वर्षांच्या मुलीसोबत तिच्या मामा आणि मामीने मिळून अतिशय संतापजनक कृत्य केल्याचं वृत्त आहे. आरोपी मामा आणि मामीने मिळून रात्री जवळपास 12 वाजताच्या सुमारास पीडितेचं अपहरण केलं आणि तिला विकल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? 

90,000 हजार रुपयांसाठी भाचीला विकलं 

आरोपींनी केवळ 90,000 हजार रुपयांसाठी भाचीला एका व्यक्तीकडे विकलं. त्यानंतर, त्या व्यक्तीने पुढे निष्पाप पीडितेला दुप्पट किंमतीत म्हणजेच 1,80,000 रुपयांत दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकलं. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, वाकोला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई सुरू केली. तपासादरम्यान, पोलिसांच्या पथकाने मुलीला पनवेल परिसरात ट्रॅक केलं. 

हे ही वाचा: मुंबई: "तुझी पत्नी तुला सोडून गेली..." लग्न मोडल्याने सतत टोमणे, संतापलेल्या गणेशने मित्राची केली निर्दयी हत्या!

पोलिसांनी घेतला शोध 

त्यानंतर, 25 नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या पथकाने मुलीला मुंबईत परत आणलं. पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी 5 वर्षांच्या पीडितेला चॉकलेट देत तिला दिलासा दिला आणि नंतर, तिला तिच्या आईकडे सोपवण्यात आलं. पोलिसांनी मुलांना विकणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करत मुलीच्या मामा आणि मामीसह पाचही आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. 

हे ही वाचा: मुंबई: तरुणीने रिक्षा चालकाला केलं ऑनलाइन पेमेंट! पण, काही वेळानंतर घाणेरडे मॅसेजेस अन्... मीरा रोड येथील घटना

पाच आरोपींना केली अटक 

यासंबंधी पोस्ट करत पोलिसांनी लिहिलं की, पाच वर्षांच्या मुलीच्या अपहरण आणि तस्करी केल्याच्या प्रकरणात शोध घेण्यात आला असून पीडितेला पनवेलमध्ये सुखरुपपणे ताब्यात घेतलं आणि यामध्ये सहभागी असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या मामा आणि मामीने आपल्या भाचीला 90 हजार रुपयांत विकलं होतं आणि नंतर संबंधित व्यक्तीने तिला दुप्पट किंमतीत म्हणजेच 1 लाख 80,000 रुपयांना विकलं. यासंबंधीत तात्काळ कारवाई करत, पोलीस पथकाने मुलीची सुटका केली आणि तिला तिच्या आईकडे सुखरुपपणे सोपवण्यात आलं. पोलीस आता या घटनेचा सखोल तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp