मुंबई: "तुझी पत्नी तुला सोडून गेली..." लग्न मोडल्याने सतत टोमणे, संतापलेल्या गणेशने मित्राची केली निर्दयी हत्या!

मुंबई तक

मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

संतापलेल्या गणेशने मित्राची केली निर्दयी हत्या!
संतापलेल्या गणेशने मित्राची केली निर्दयी हत्या!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"तुझी पत्नी तुला सोडून गेली..." लग्न मोडल्याने सतत टोमणे

point

संतापलेल्या गणेशने मित्राची केली निर्दयी हत्या!

Mumbai Murder Case: गुरुवारी (27 नोव्हेंबर) सकाळी मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. घटनेच्या काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव दिलखुश शाह असून त्याचा मित्र गणेश हा त्याच्यासोबतच एका केटरिंग कंपनीत काम करत होते. दोघांचं घरसुद्धा एकमेकांच्या जवळ असून ते दोघे मूळ बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील एका गावाचे रहिवासी होते.

मोडलेल्या लग्नावरून मित्राचं चिडवणं 

मिळालेल्या माहितीनुसार, दिलखुश हा गणेशला त्याचं लग्न मोडल्याबद्दल सतत चिडवायचा आणि नेहमी त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याचे टोमणे मारायचा. मोडलेल्या लग्नावरून मित्राचं चिडवणं आणि टोमणे मारणं, गणेशला असह्य होत होतं. याच कारणामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. गुरुवारी रात्री जवळपास 12:25 वाजताच्या सुमारास दोघे एकत्र कामावर जात होते. दरम्यान, मालाड पश्चिम येथील लाइफलाइन रुग्णालयाजवळ दोघांमध्ये मोठा वाद झाला. नंतर, या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. 

हे ही वाचा: मुंबई: तरुणीने रिक्षा चालकाला केलं ऑनलाइन पेमेंट! पण, काही वेळानंतर घाणेरडे मॅसेजेस अन्... मीरा रोड येथील घटना

चाकूने वार करत मित्राची हत्या 

या वादातून गणेशने रागाच्या भरात त्याच्याकडे असलेला भाजी चिरण्याचा चाकू बाहेर काढला आणि दिलखुशच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर, पीडित तरुण रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला आणि आरोपी गणेश तिथून फरार झाला. या घटनेनंतर, स्थानिकांनी जखमी झालेल्या तरुणाला पाहिलं आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दिलखुशला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

हे ही वाचा: कारमध्ये बसली पत्नी, नंतर मित्राला सुद्धा मागे बसवलं अन्... महिलेसोबत घडली भयानक घटना

प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि स्थानिकांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी गणेशला लवकरच ताब्यात घेतलं आणि त्याला अटक केली. मालाड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS)संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोस्टडीत पाठवण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp