कारमध्ये बसली पत्नी, नंतर मित्राला सुद्धा मागे बसवलं अन्... महिलेसोबत घडली भयानक घटना

मुंबई तक

एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण अपहरण आणि नंतर हत्याकांडात बदलेल, अशी कोणी कल्पना देखील केली नव्हती.

ADVERTISEMENT

महिलेसोबत घडली भयानक घटना
महिलेसोबत घडली भयानक घटना
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कारमध्ये पत्नीसोबत पतीने केलं भयानक कृत्य

point

मित्राला सुद्धा गाडीत बसवलं अन् धक्कादायक घटना...

Crime News: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण अपहरण आणि नंतर हत्याकांडात बदलेल, अशी कोणी कल्पना देखील केली नव्हती. तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसं सत्य उघडकीस येऊ लागलं. पीडित महिलेला तिच्याच कारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, पतीनेच आपल्या पत्नीची गोळी झाडून निर्दयी हत्या केली. 

महिला बेपत्ता असल्याची तक्रार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी दयालपूर पोलिस स्टेशनमध्ये 25 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्न केले, परंतु तपासादरम्यान, पीडितेच्या आईला आपल्या मुलीचं अपहरण झाल्याचा संशय आला. महिलेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, आयपीसीच्या कलम 140(3) अंतर्गत दयालपूर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. 

संशयिताला अटक 

तपास सुरू असताना, दयालपूर पोलीस स्टेशनच्या तीन निरीक्षकांनी एक प्लॅन आखला आणि त्यांच्या पथकांनी पुरावे गोळा करून महत्त्वाची माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे, पथकाने प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध सुरू केला आणि त्याला अटक केली. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान, अटक केलेल्या संशयिताची ओळख फैजल (28) अशी झाली असून तो खजूरी नंबर 15 येथील रहिवासी आहे. 

हे ही वाचा: आधी कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध! लग्नानंतर 6 महिन्यांतच नाशिकमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

पत्नीची हत्या केल्याची कबुली 

चौकशीदरम्यान, आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं. त्याने पोलिसांना माहिती देताना पुढे सांगितले की 20 नोव्हेंबर 2025 रोजी तो त्याच्या पत्नी आणि मित्रासह कारमधून घरी परतत असताना त्यांनी पीडितेवर गाडीतच गोळी झाडली. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह फेकून दिला आणि तिथून फरार झाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp