मुंबई: तरुणीने रिक्षा चालकाला केलं ऑनलाइन पेमेंट! पण, काही वेळानंतर घाणेरडे मॅसेजेस अन्... मीरा रोड येथील घटना
एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने रिक्षा चालकाला Gpay (गूगल पे) च्या माध्यमातून पेमेन्ट केलं. मात्र, त्यानंतर त्या रिक्षा चालकाने तरुणीची वैयक्तिक माहिती शोधली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीने रिक्षा चालकाला केलं ऑनलाइन पेमेंट!
पण, काही वेळानंतर घाणेरडे मॅसेजेस अन्...
मुंबईच्या मीरा रोड येथील धक्कादायक घटना
Mumbai Crime: मुंबईतील मीरा रोड परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना विशेषतः तरुणी आणि महिलांना सावध करणारी आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने रिक्षा चालकाला Gpay (गूगल पे) च्या माध्यमातून पेमेन्ट केलं. मात्र, त्यानंतर त्या रिक्षा चालकाने तरुणीची वैयक्तिक माहिती शोधली. या माहितीच्या आधारे, आरोपी पीडितेच्या घरापर्यंत पोहोचला आणि तिच्या नंबरवर घाणेरडे मॅसेज सुद्धा पाठवले. स्थानिक माध्यमांमध्ये या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक आरोपी रिक्षा चालकासोबत वाद घालताना दिसत आहेत. पुन्हा एकदा ऑनलाइन पेमेंटद्वारे वैयक्तिक माहिती ट्रॅक करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घाणेरडे मॅसेजेस पाठवायला सुरूवात..
मिळालेल्या माहितीनुसार, एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 23 नोव्हेंबर रोजी रात्री जवळपास 9:30 वाजताच्या सुमारास कनकिया रोडवरून एका रिक्षात बसली. त्यावेळी, तिने Gpay चा वापर करून भाडं दिलं. मात्र, त्या रिक्षात बसणं पीडितेला महागात पडलं. रिक्षा चालकाला तरुणीकडून पैसे मिळाल्यानंतर, ड्रायव्हरने पीडितेला चुकीचे मॅसेजेस पाठवण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर, आरोपी चालकाने तिचं इंस्टाग्राम प्रोफाइल सुद्धा शोधून काढलं.
हे ही वाचा: कारमध्ये बसली पत्नी, नंतर मित्राला सुद्धा मागे बसवलं अन्... महिलेसोबत घडली भयानक घटना
पीडितेच्या मित्रांनी आखली योजना
त्यानंतर, रिक्षा चालकाने तरुणीला गार्डनमध्ये भेटायला येण्यासाठी मॅसेज केला. त्या मॅसेजला तरुणीने काहीच उत्तर दिलं नाही. परंतु, यावर तो आरोपीने नको ते कृत्य करणं थाबवलं नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास, संबंधित रिक्षा चालक तरुणीला पूनम गार्डनमधील तिच्या बिल्डिंगच्या बाहेर दिसला. पीडितेच्या मित्रांनी तोच रिक्षा चालक असल्याची पुष्टी करण्यासाठी चॅटद्वारे त्याला प्रतिसाद देण्याचं नाटक केलं.
हे ही वाचा: Personal Finance: दरमहा 10 हजार गुंतवा मिळवा 32 लाख.. कोणती आहे ही भन्नाट योजना?
स्थानिकांनी केली बेदम मारहाण
चॅटिंग करताना आरोपीने तरुणीला एकदा भेटण्याचा आग्रह धरला. दुसऱ्या दिवशी, जेव्हा रिक्षाचालक परिसरात आला तेव्हा स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आता, पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसात या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.










