अल्पवयीन गर्लफ्रेंडसोबत रोहित लिंगायतची हाय व्होल्टेज टॉवरला गळफास लावून आत्महत्या
Chandrapur Couple Suicide: एका 25 वर्षीय तरुणाने त्याच्या अल्पवयीन गर्लफ्रेंडसोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वीजेच्या हाय व्होल्टेज टॉवर गळफास लावून जोडप्याची आत्महत्या

25 वर्षीय तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत होते प्रेम संबंध

26 फेब्रुवारीपासून दोघेही झाले होते बेपत्ता
Chandrapur Loving couple Suicide Case: विकास राजूरकर, चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये एका प्रेमी युगुलाने हाय व्होल्टेज वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. 25 वर्षीय प्रियकर आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीचे मृतदेह टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता पोलीस या आत्महत्येमागील कारणांचा तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तहसीलमधील उच्छली गावातील आहे. प्रेमी युगुलाने गावाबाहेर शेतात बांधलेल्या हायव्होल्टेज वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली.
25 वर्षीय रोहित रमेश लिंगायत आणि 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपले जीवन संपवलं आहे. या दोघांचं मागील काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. उच्छली गावातील रोहित लिंगायत या तरुणाचे चांडाली गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते, ती मुलगी नववीत शिकत होती आणि भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहत होती. तिचे पालक कामगार आहेत. ती काही दिवसांपूर्वी वसतिगृहातून घरी आली होती.
हे ही वाचा>> Pune : पोलीस आणि दरोडेखोर आमने-सामने, कोयत्यांना गोळीबाराने उत्तर, थरारात पोलीस जखमी, आरोपी अटक
26 फेब्रुवारी रोजी सकाळी तिचे वडील कामावर गेले होते आणि आई घरकामात व्यस्त असताना रोहित दुचाकीवरून तिच्या घरासमोर आला आणि त्याने मुलीला घराबाहेर बोलावले आणि दोघेही दुचाकीवरून पळून गेले.