sakshi murder : ‘प्रविणसाठी ती मला वापरत होती अन्…’, साहिलने पोलिसांना सगळंच सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Delhi Sakshi Murder Case : The question arises that what did Sakshi do that Sahil was determined to kill her and that too brutally.
Delhi Sakshi Murder Case : The question arises that what did Sakshi do that Sahil was determined to kill her and that too brutally.
social share
google news

sakshi murdered by sahil news : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातून अटक केलेला आरोपी साहिल सध्या दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिसांकडून साहिलची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने अतिशय धक्कादायक खुलासे केले. अल्पवयीन साक्षीची इतक्या क्रूरपणे हत्या केल्याचा त्याला जराही पश्चाताप नाही. उलट, साक्षीला तिच्या कृत्याची शिक्षा दिली आहे, असं म्हणत तो पोलिसांसमोर हसताना दिसला. (Why did Sahil murdered Sakshi?)

ADVERTISEMENT

साक्षीच्या हत्येनंतर एक प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे साहिलने साक्षीला इतक्या क्रूरपणे का मारलं? याबद्दल साहिलने पोलिसांना जे काही सांगितले आणि ज्या पद्धतीने सांगितले ते हादरवून टाकणारे आहे. स्वत:च्या हाताने केलेली हत्या योग्य आहे, हे पटवून देताना साहिलने पोलिसांना सांगितले की, “त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याचा वापर होऊ द्यायचा नव्हता आणि ती (साक्षी) त्याचा वापर करत होती. साहिलच्या म्हणण्यानुसार, साक्षी साहिलला तिच्या आणि प्रवीणमध्ये मोहरा बनवत होती. फक्त प्रवीणला चिडवण्यासाठी आणि त्याला धडा शिकवण्यासाठी, तसेच त्याला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तिने साहिलशी मैत्री केली होती. आणि प्रवीणला सांगून ती साहिलशी बोलायची.

साहिलने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हादरले

साहिल इतकं सांगूनच थांबला नाही तर त्याने पोलिसांना असंही सांगितलं की, त्याने साक्षीला अनेक वेळा असे करण्यापासून रोखले आणि तिला सांगितले की, अशा गोष्टी करू नको नाहीतर परिस्थिती आणखी बिघडेल… पण साक्षीने त्याचे ऐकले नाही. त्यापेक्षा त्याला न आवडणाऱ्या त्या सर्व गोष्टी ती स्वतःच्या इच्छेने करायची, पण इतरांच्या इच्छेची तिला पर्वा नव्हती. साहिलने पोलिसांना सांगा की, माझं मन मन नाहीये का, जर आपल्या मनाला त्रास होत असेल तर काय करायचं? मी त्या मुलीला खूप समजावले, पण तिने माझे ऐकले नाही, तेव्हा मी मला पाहिजे ते केले.

हे वाचलं का?

साहिलने धक्कादायक कारण सांगितले

साक्षीला मारण्यासाठी साहिलने पोलिसांना दिलेले कारण धक्कादायक आहे. तो म्हणतो की, साक्षी त्याचा वापर करत होती आणि त्याला स्वतःचा वापर होऊ द्यायचा नव्हता म्हणून त्याने तिची हत्या केली. साहिलने पोलिसांना सांगितले की, प्रवीण व्यतिरिक्त अनेक मुले साक्षीचे मित्र होते आणि साहिलशी मैत्री करण्यामागे साक्षीचा हेतू होता की तिला हे नाते दाखवून प्रवीणला जळवायचे होते. पण साहिलचा यावर आक्षेप होता. आणि याच मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले होते.

हेही वाचा >> साक्षीच्या डोक्यात 7 वेळा दगड टाकणाऱ्या साहिलचं सापडलं सोशल मीडिया प्रोफाइल!

बघणारेही हादरले

या सगळ्यात साहिलने साक्षीला इतकं क्रूरपणे का मारलं? हा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे. त्याने साक्षीला अशा पद्धतीने मारलं की, जे पाहून जग हादरले. गेल्या अनेक तासांपासून सोशल मीडियापासून टीव्ही न्यूज चॅनेल्सपर्यंत पडद्यावर एक चित्र आणि एका व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे, ते म्हणजे साक्षीच्या हत्येचा. ज्यामध्ये साहिल नावाच्या आरोपीने आधी रस्त्याच्या एका कोपऱ्यात एका 16 वर्षीय मुलीवर चाकूने वार केले आणि नंतर तिला दगडाने ठेचले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> आधी मैत्री नंतर लग्नाचे आमीष दाखवून…,घटनाक्रमाने पोलीसही हादरले

जाणीवपूर्वक खून

ज्यांनी ही छायाचित्रे आणि व्हिडीओ पाहिला ते सगळेच शॉक झाले. काहीजण अस्वस्थही झाले असतील. दरम्यान, या हत्याकांडाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आणि त्या खुलाशांच्या पार्श्‍वभूमीवर असे बोलले जात आहे की, साहिलने हा खून केवळ रागातून केला नसून, पूर्ण शुद्धीत असतानाच त्याने आधी या हत्येचा कट रचला, खुनासाठी त्याने चाकू विकत घेतला. अनेक दिवस पाठलाग करून रविवारी रात्री हत्या केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> राज ठाकरेंनी ब्रिजभूषण सिंहांच्या विरोधात थोपटले ‘दंड’! PM नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

साहिल अनेक प्रश्न टाळतोय

साहिलने हा चाकू 15 दिवसांपूर्वी हरिद्वार येथून विकत घेतला होता. ज्याचा वापर करून त्याने साक्षीला सुमारे 40 वार करून ठार केले. पोलीस साहिलने आपला गुन्हा कबूल करावा म्हणून प्रयत्न करत आहेत, पण साहिल एक ना एक प्रकारे या प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपणच साक्षीची हत्या केल्याचे कबूल केले असून, या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याची कबुलीही त्याने दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT