थेट डोक्यातच घुसवला चाकू अन् 40 वार… साक्षीच्या भयंकर हत्येची Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Sakshi Murder Case Delhi : देशाची राजधानी दिल्लीच्या शाहदाबादमध्ये (Delhi) साक्षी हत्याकांड (Sakshi Murder) घडलं आहे. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेवरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी (police) साक्षी हत्या प्रकरणातील आरोपी साहिलला (Sahil) उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातून अटक केली आहे. आरोपी साहिलने 40 वेळा चाकुने भोसकून आणि दगडाने ठेचून साक्षीची निघृण हत्या केली होती. या हत्येने देशभऱात खळबळ माजली आहे. दरम्यान साहिलने तिची हत्या का केली? या हत्येमागचा उद्देश काय होता? हे जाणून घेऊयात. (sakshi murder case who killed by sahil arrested in uttar prsdesh shahbad delhi crime story)

ADVERTISEMENT

हत्येच्या उद्देशानेच भेटला…

आरोपी साहिल (Sahil) पुत्र सरफराज आणि अल्पवयीन साक्षी (Sakshi Murder) (वय 16) हे दोघेही नात्यात होते. साक्षी त्या दिवशी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घरातून निघाली होती. या दरम्यान साक्षीच्या घराच्याच रस्त्यावर आरोपी साहिलने तिला रोखले आणि वाद घालायला सुरूवात केली. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून आरोपी साहिलने खिशातून चाकू काढून साक्षीवर सपासप वार करायचा सुरूवात केली. अगदी छाती, डोक्यावर त्याने श्वासही न घेता तब्बल 40 वार करून हत्या केली. साहिलच्या या हल्ल्यानंतर साक्षी जागच्या जागीच खाली पडली. आरोपी साहिलचा (Sahil) राग इतक्यावर शमला नाही तर त्याने दगडाने ठेचून देखील तिची हत्या केली. एका माथेफिरूप्रमाणे त्याने हे हत्याकांड केले होते. या हत्येनंतर जमावासमोर ओरडून त्याने पळ काढला होता.

हे ही वाचा : Delhi Crime: सपासप.. चाकूचे 40 वार नंतर दगडाने केला गर्लफ्रेंडचा चेंदामेंदा

हत्येमागचं कारण काय?

गर्लफ्रेंड साक्षी (Sakshi Murder) हिच्या हत्येमागचं कारण त्यांच्या दोघांमधील भांडण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि साहिल दोघेही नात्यात होते. रविवारी त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाच्या दुसऱ्या दिवशी साहिलने तिची निघृण हत्येचा कट रचला होता.या संपूर्ण घटनेने देश हादरला आहे.

हे वाचलं का?

राजकीय वातावरण तापलं

दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुन्हेगार बेधडक झालेत, पोलिसांचा धाक उरलेला नाही. उपराज्यपाल साहेब, कायदा आणि सुव्यवस्था ही तुमची जबाबदारी आहे, काहीतरी करा. दिल्लीतील जनतेची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देत उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्यावर टीका केली आहे.

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत आणखीण एका श्रद्धाची निघृण हत्या करण्यात आली आहे. भररस्त्यात ही हत्या करण्यात आली आहे. गल्ली गल्लीत केरळा स्टोरी आहे? आफताब आणि सरफराज सारख्या राक्षसांकडून अल्पवयीन श्रद्धा आणि साक्षीचा असा बळी दिला जाणार आहे? अखेर कधी पर्यंत? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप

महिला आयोगाची नोटीस

साक्षी हत्या प्रकरणाची दखल दिल्लीच्या महिला आयोगाने देखील घेतली आहे. या घटनेवरून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की, दिल्लीच्या शाहबाद डेरीत एका अल्पवयीन मुलीची चाकुने वार करून हत्या करण्यात आली, त्यानंतर तिला दगडाने ठेचण्यात आले होते. दिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात आरोपीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, मी माझ्या करिअरमध्ये यापेक्षा भयानक घटना पाहिले नाही आहे, असे देखील मालिवाल यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

साहिलला उत्तर प्रदेशमधून अटक

दरम्यान या साक्षी हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर साक्षीच्या वडिलांनी शाहदाबाद पोलीस ठाण्यात आयपीसी धारा 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी साहिलला उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे ही वाचा : Ulhasnagar: शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाच्या निर्घृण हत्येचं खरं कारण आलं समोर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT