समीर वानखेडेंना थेट परदेशातून आली जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

Sameer Wankhede Death threat from Bangladesh complaint by fax from Chennai
Sameer Wankhede Death threat from Bangladesh complaint by fax from Chennai
social share
google news

Sameer Wankhede Threat : आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकून आर्यन खानसह (Aryan Khan) 8 जणांवर ड्रग्ज (Drugs) प्रकरणी समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. त्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले. ते एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Former NCB Zonal Officer Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) मिळाली असल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धमकी प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसात (Mumbai Police) तक्रार दिली असून ते चेन्नईत असल्याने त्यांनी ही तक्रार फॅक्सद्वारे (Complaint by fax) करण्यात आली आहे. त्यांना धमकी कोणी दिली त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

धर्माबाबत शिवीगाळ

एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की, मला धमकीचा मेसेज आला होता. तर ज्या कोणी धमकी दिली आहे. त्या व्यक्तीने आपल्याला धर्माबाबत वाईट बोलून शिवीगाळही केली आहे. त्यामुळे या प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली असून त्याबाबत अजून गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

हे ही वाचा >>पालघर: पत्नी पतीला निरोप द्यायला गेली अन् काळाने साधला डाव; चिमुकलीचा करुण अंत

मुलांनाही धमकी

समीर वानखेडे यांनी सांगितले की, मला धमकी दिली आहेच मात्र माझ्या बरोबरच माझ्या मुलानांही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे चेन्नईत असलेल्या समीर वानखेडे यांनी ई-मेलद्वारे मुंबई पोलीस आयुक्तांना व गोरेगाव पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आर्यन खानवर कारवाई

गेल्या काही दिवसांपासून समीर एनसीबीचे समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले आहेत.कारण त्यांनी दोन वर्षापूर्वी ड्रग्ज प्रकरणी कारवाई करुन अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर कारवाई केली होती. त्यावेळेपासून ते चर्चेत आले आहेत.

हे ही वाचा >> मुंबई लोकलमध्ये ‘दे दणा दण’! गळा पकडला अन्…; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

बांगलादेशातून धमकी

समीर वानखेडे यांना देण्यात आलेली जीवे मारण्याची धमकी ही बांगलादेशातून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या मुंबई पोलिसांना फक्त फॅक्सद्वारे तक्रार नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT