Satara Crime: पत्नी जास्त बोलत असल्याने नवऱ्याने थेट... उचललं टोकाचं पाऊल
Satara Crime News: कराड तालुक्यातील एका गावात पत्नी जास्त बोलत असल्याच्या कारणावरून तिच्या पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कराडमध्ये घडली धक्कादायक घटना
पत्नी जास्त बोलत असल्याने पतीने घेतला जीव
पत्नी जास्त बोलत असल्याने पतीने घेतला जीव
Wife Murder: सकलेन मुलाणी, कराड: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विंग या गावी एका धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी जास्त बोलत असल्याने नवऱ्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. या घटनेत मयुरी कणसे या 27 वर्षीय विवाहित महिलेचा जीव गेला आहे. मयुरीची हत्या करणाऱ्या पती मयूर कणसे याला कराड तालुका पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. (satara karad crime husband kills wife because she talks too much police arrest accused husband)
नेमकी घटना काय?
मयूर आणि मयुरीचा विवाह 2018 साली झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. पण लग्नापासूनच या दाम्पत्यामध्ये सतत वाद व्हायचे. मात्र, काल (2 जानेवारी) क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर पती मयूर याने पत्नीची गळा आवळून हत्या केली.
हे ही वाचा>> Pune Crime: घरासमोर लघुशंका करताना थांबवलं, पुण्यात मुजोर तरूणांनी महिलेचा जीवच घेतला..
जीव गमावलेल्या मयूरीचे माहेर कराड तालुक्यातील गोळेश्वर गावी आहे. लग्न झाल्यापासूनच मयुरीला व्यवस्थित वागणूक दिली जात नसल्याचा आरोप मयुरीच्या माहेरकडील लोकांनी केला आहे. यापूर्वीही मयुरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

मुलगी लग्न झाल्यापासून अनेकदा माहेरीच यायची. सततच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी राहत होती. पण गेल्या सहा महिन्यापूर्वी मयुरी सासरी गेल्याचं तिच्या आईने सांगितलं.









