Mumbai Crime : चुकलं की बाजूला नेऊन…; विक्रोळीत वासनांध शिक्षकाकडून 4 विद्यार्थिनींवर अत्याचार
mumbai crime news : four minor girl raped by school teacher in vikroli. police filed fir and arrested accused.
ADVERTISEMENT
Vikroli news : विद्यार्थी चुकला की शिक्षक शिक्षा करतातच, पण विक्रोळीतील शाळेत शिक्षकाने केलेल्या प्रकाराने खळबळ उडालीये. शारीरिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या एका वासनांध शिक्षकाने चार विद्यार्थिनींचं लैगिंक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार विक्रोळीत महापालिकेच्या शाळेत घडला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सौरभ उचाटे (वय 23) असे आरोपीचे नाव आहे.
विक्रोळीत महापालिकेची एक शाळा आहे. या शाळेच्या व्यवस्थापनाचे काम एका स्वयंसेवी संस्थेला देण्यात आले आहे. या शाळेत सौरभ उचाटे हा शारीरिक शिक्षण म्हणून शिकवणी घ्यायचा. दरम्यान, एका सात वर्षाच्या चिमुकलीने तिच्या आईला घडत असलेला प्रकार सांगितला आणि पालक हादरून गेले.
हे वाचलं का?
सौरभ उचाटे काय करायचा?
झालं असं की, विक्रोळीतील या शाळेत शिकणाऱ्या एका सात वर्षाच्या विद्यार्थिनीने तिच्या आईकडे घडत असलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. सोमवारी (21 ऑगस्ट) मुलीने सांगितले की, सौरभ उचाटे हा काही चूक झाली की बाजूला घेऊन जातो. शिक्षा करण्याचं निमित्त करून बाजूला नेल्यानंतर अश्लील कृत्ये करतो.
मुलीने सांगितलेल्या हा घटनाक्रम ऐकून तिची आई हादरली. महिलेने मुलीला सोबत घेतले आणि विक्रोळी पोलीस ठाणे गाठले. महिलेने सौरक्ष उचाटे शाळेत करत असलेल्या कृत्यांबद्दल तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनुसार सौरभ उचाटे विरुद्ध बलात्कार, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
पीडित तीन चार विद्यार्थी आल्या समोर
सौरभ उचाटे हा ठाणे येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. सौरभ उचाटेला अटक केल्याची माहिती शाळेत कळल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची शाळेत चर्चा सुरू झाली.
ADVERTISEMENT
दरम्यान, शाळेत चर्चा झाल्यानंतर सात ते आठ वर्षाच्या आणखी तीन विद्यार्थींनी आमच्यासोबतही सौरभ उचाटे असे केले असल्याचे त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितले. त्यांच्या या माहितीने पालक हादरले.
या मुलींच्या पालकांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रारी दिल्या. ज्या मुलींवर सौरभ उचाटेने अत्याचार केलेत, त्या दुसरी आणि तिसरीत शिकत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सौरभ उचाटे यांच्या मोबाईलमध्ये काही क्लिप सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT